भारतीयांविरोधात अमेरिकेने रचला भयानक कट, ट्रम्प यांच्या टोळीचा कारनामा वाचून थक्क व्हाल

काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी एच-1बी व्हिसा धारकांच्या फीमध्ये मोठी वाढ केली आहे. यामुळे भारतीय आयटी नोकरदारांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. आता अमेरिकेने भारतीयांवरोधात मोठा कट रचल्याचे समोर आले आहे.

भारतीयांविरोधात अमेरिकेने रचला भयानक कट, ट्रम्प यांच्या टोळीचा कारनामा वाचून थक्क व्हाल
Trump Visa
| Updated on: Sep 29, 2025 | 3:38 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे जगातील बहुतेक देशांवर परिणाम झाला आहे. काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी एच-1बी व्हिसा धारकांच्या फीमध्ये मोठी वाढ केली आहे. यामुळे भारतीय आयटी नोकरदारांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. या घोषणेवेळी जे भारतीय लोक अमेरिकेबाहेर गेलेले होते, त्यांना परत येऊ न देण्यासाठी अमेरिकेने मोठा कट रचल्याचे आता समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेनंतर जे लोक अमेरिकेबाहेर गेले होते, त्यांना देशात परतण्यासाठी दोन दिवसांचा वेळ देण्यात आला होता. या काळात बरेच लोक भारतात होते, तर काही लोक अमेरिकेबाहेर सुट्टी घालवत होते. मात्र ते काम करत असलेल्या कंपन्यांनी त्यांना 2 दिवसात कामावर परतण्याचा आदेश दिला होता. या 48 तासात भारतीय लोक वेळेवर अमेरिकेत परतू नये यासाठी ट्रम्प यांनी एक मोठा कट रचला होता.

4 चॅन प्लॅटफॉर्मवर क्लॉग द टॉयलेट नावाची एक मोहीम सुरू करण्यात आली होती. याचा हेतू भारतातून अमेरिकेला जाणाऱ्या फ्लाइट्सच्या बुकिंग सिस्टममध्ये जाणूनबुजून व्यत्यय आणणे हा होता. काही युजर्सना भारताकडून अमेरिकेला जाणाऱ्या फ्लाइट्स शोधण्यास त्यानंतर चेकआउट पेजवर प्रवेश करण्यास सांगितले होते, मात्र या लोकांना बुकिंग न करण्याचा सल्ला देण्यात आला होता. एअरलाइन वेबसाइट्सवर तांत्रिक भार टाकून भारतीय लोकांच्या तिकीट बुकिंगमध्ये व्यत्यय आणण्याचे हा प्रयत्न होता. 4chan वरील मेसेजमध्ये भारतीयांना अमेरिकेत परतण्यापासून रोखले पाहिजे असा स्पष्ट संदेश देण्यात आला होता.

फ्लाइट्सच्या बुकिंग सिस्टममध्ये व्यत्यय कसा आणला?

4chan वरील काही युजर्सनी दिल्ली-न्यूयॉर्क, मुंबई-डलास असे भारतीय H-1B व्हिसा धारक वापरणारे मार्ग निवडले. बुकिंग विंडो सुरु झाल्यानंतर या लोकांनी वेबसाईटवर प्रवेश केला मात्र पेमेंट किंवा बुकिंग केली नाही. यामुळे ज्या लोकांना तिकीट हवे आहे त्यांना तिकीट मिळू शकले नाही. त्यानंतर या लोकांना भारतीयांविरोधात वंशवादी आणि आक्रमक कमेंट करत भारतीय प्रवाशांमध्ये भीती आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

भारतीयांवर परिणाम

अमेरिकेतील मायक्रोसॉफ्ट, जेपी मॉर्गन आणि मेटा या बड्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना 21 सप्टेंबरच्या अंतिम मुदतीपूर्वी अमेरिकेत परतायचे होते. मात्र यासाठी त्यांना तिकीट मिळत नव्हते, तसेच ज्या लोकांना तिकीट मिळाले त्यांना दुप्पट रक्कम मोजावी लागली. कारण 4chan युजर्सनी शेकडो सीट्स लॉक केल्या होत्या. त्यामुळे अनेकांना त्रासाचा सामना करावा लागला.