Plane crash : दोन विमानांचा भीषण अपघात, हवेतच समोरा समोर धडक, सर्वांचा मृत्यू

मोठी बातमी समोर येत आहे, दोन विमानांचा भीषण अपघात झाला आहे. विमानांची समोरा समोर धडक झाली. अपघातानंतर ही दोन्ही विमान थेट खाली कोसळली आहेत. या अपघातात विमानांमधील सर्वांचा मृत्यू झाला आहे.

Plane crash : दोन विमानांचा भीषण अपघात, हवेतच समोरा समोर धडक, सर्वांचा मृत्यू
विमानांचा भीषण अपघात
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 24, 2026 | 3:13 PM

गेल्या काही दिवसांमध्ये विमान अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. 12 जून 2025 रोजी अहमदाबादमध्ये भीषण विमान अपघात झाला होता. या विमानाने लंडनला जाण्यासाठी टेक ऑफ केलं होतं. मात्र त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच हे विमान एका महाविद्यालयाच्या छतावर कोसळलं, या विमान दुर्घटनेत 265 हुन अधिक जणांचा मृत्यू झाला होता, त्यानंतर देखील विमान अपघाताच्या अनेक घटना घडल्या. बांग्लादेशमध्ये देखील एका शाळेवर विमान कोसळलं होतं. दरम्यान त्यानंतर आता पुन्हा एकदा दोन विमानाचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. फिलिपाईन्समध्ये ही घटना घडली आहे. दोन विमानांची हवेतच भीषण धडक झाली आहे. या अपघातामध्ये विमानांमध्ये असलेल्या चारही पायलटचा मृत्यू झाला आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, फिलिपाईन्स एअर फोर्सच्या दोन विमानाचा हवेतच अपघात झाला आहे. या विमानांची समोरासमोर धडक झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघातानंतर हे दोन्ही विमान खाली कोसळले, या अपघातामध्ये विमानात असलेल्या चारही पायलटचा मृत्यू झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार लिपान सिटीच्या फर्नांडो एअरबेसवर ही दुर्घटना घडली आहे. दरम्यान फिलिपाईंन्स एअर फोर्सकडून या अपताबाबत दु:ख व्यक्त करण्यात आलं आहे. अपघाताची माहिती मिळताच तातडीने बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं होतं. मात्र या अपघातामध्ये विमानातील एकही व्यक्ती वाचू शकलेला नाही. मृत पायलटच्या कुटुंबीयांना या अपघाताची माहिती कळवण्यात आली आहे, असं फिलिपाईन्स एअर फोर्सच्यावतीने माहिती देण्यात आली आहे.

Loading...

66 वर्ष जुनं मॉडल

ज्या विमानांचा अपघात झाला आहे, ते दोन्ही विमान 66 वर्ष जुन्या मॉडेलचे आहेत. 1960 मध्ये इटलीमध्ये या विमानांचं डिझाइन करण्यात आलं होतं. हे विमान खूप जुन्या मॉडेलचे असल्यामुळे फिलिपाईन्स एअर फोर्समध्ये या विमानांचा वापर फक्त ट्रेनिंगसाठीच केला जायचा, परंतु ट्रेंनिग सुरू असतानाच या विमानाचा अपघात झाला. हे विमान खूप हलक्या वजनाचे असतात, त्यामुळे नैसर्गिक आपत्तीच्या वेळी देखील या विमानांचा वापर करतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us