इराणमध्ये 1 लीटर पेट्रोलची किंमत ऐकून येईल चक्कर, भारतातील पाण्याच्या बॉटलपेक्षाही स्वस्त..

इराण आणि अमेरिका युद्धात पेट्रोल आणि डिझेलचे भाव झपाट्याने वाढताना दिसले. त्यातच पुन्हा कच्च्या तेलाचे भाव जागतिक बाजारात वाढली आहेत. आता एक व्हिडीओ पुढे आला असून मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळतंय.

इराणमध्ये 1 लीटर पेट्रोलची किंमत ऐकून येईल चक्कर, भारतातील पाण्याच्या बॉटलपेक्षाही स्वस्त..
Iran petrol
| Updated on: Sep 01, 2026 | 1:45 PM

इराण आणि अमेरिका युद्धात अनेक देशांना मोठा फटका बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या भावात मोठी वाढ झाली. अमेरिकेने इराणवर हल्ला केला. त्यानंतर आता पुन्हा जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झपाट्याने वाढत आहेत. तेलाच्या किमती भडकल्या आहेत. भारतात 111 रूपये प्रति लीटर पेट्रोलचा भाव आहे. शहरानुसार कमी अधिक किमती आहेत. मात्र, 100 च्या पुढेच भारतात पेट्रोलचे दर आहेत. सध्या सोशल मीडियावर सर्वांना थक्क करणारा व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे. भारतीय व्लॉगर गाैरव शर्मा थेट इराणमध्ये आपल्या गाडीत पेट्रोल भरताना दिसतोय. यादरम्यान त्याने इराणमधील पेट्रोलचा भाव सांगितला, ज्याने एकच खळबळ उडाली. भारतात पिण्याच्या पाण्याच्या भावापेक्षाही स्वस्तात पेट्रोल मिळते.

इराणमध्ये फक्त 8 रूपये प्रति लीटर पेट्रोलचा भाव आहे. गाैरव याने इराणमधील पेट्रोल पंपावर 33 रूपयांचे पेट्रोल भरले. ज्याची किमत भारतीय चलनानुसार, 270 होते. इराणमध्ये फक्त 8 रूपये प्रति लीटरप्रमाणे पेट्रोल मिळते. इराणमध्ये नागरिकांना पेट्रोल भरताना विशेष फ्यूल कार्ड आवश्यक आहे. गाैरवकडे हे कार्ड नसल्याने तो पेट्रोल पंपावरील व्यक्तीकडून तो कार्ड घेतो आणि आपल्या गाडीत पेट्रोल भरतो.

इराणमधील पेट्रोलचे दर पाहून सर्वांनाच धक्का बसतोय. भारतात 8 रूपयांमध्ये आज साधी पिण्याच्या पाण्याची बॉटलपण मिळत नाही. स्थानिक नागरिकांसाठी यापेक्षाही स्वस्त पेट्रोल मिळते. 2.50 ते 3 रूपयांप्रमाणे साधारणपणे इराणमध्ये पेट्रोल मिळते. इराणमध्ये कवढी मोलाच्या भावाने पेट्रोल आणि डिझेल मिळते. आता थेट व्हिडीओमध्ये दिसत आहे.

इराण आणि अमेरिका युद्धात भारतात पेट्रोल आणि डिझेलची मोठी टंचाई निर्माण झाली. भारताला कच्चे तेल मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. त्यावेळी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ करण्यात आली. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष वाढला की, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती भारतात झपाट्याने वाढताना दिसत आहेत. इराणच्या काही कच्च्या तेलाच्या प्रकल्पांवर या युद्धात हल्ला करण्यात आला. इराण आणि अमेरिका यांच्यात अजूनही युद्धविराम करार होऊ शकला नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us