तुला सहज मरण येणार नाही’, को-पायलटच्या हल्ल्यानंतर स्मित मच्छार यांनी प्रवाशांचा जीव कसा वाचवला?

smit machchhar : पायलट स्मित मच्छार यांच्या शोर्याचं जगभर कौतुक झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदीपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही कौतुक केलं. मच्छार हे मुंबईचे रहिवासी आहेत.

तुला सहज मरण येणार नाही, को-पायलटच्या हल्ल्यानंतर स्मित मच्छार यांनी प्रवाशांचा जीव कसा वाचवला?
Smit machar news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 18, 2026 | 7:14 PM

फ्लायदुबईचे विमान दुबईहून इस्त्रायलच्या तेल अवीवकडे निघालं होतं. या उड्डाणानंतर विमानात माथेफिरू को-पायलटने स्मित मच्छार यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली होती. परंतु विमान क्रॅश होण्याआधीच मच्छार यांनी संपूर्ण परिस्थिती हाताळली होती. मच्छार यांनी विमानातील 170  प्रवाशांचे जीव वाचवले होते. परंतु मच्छार हे गंभीर जखमी झाले होते. आता त्यांनी आणखी नवा खुलासा केला आहे.  हल्ल्यानंतर कॅप्टन स्मित मच्छार यांच्या मनात काय सुरू होतं, त्याविषयी मोठा खुलासा केला आहे.

‘स्काय न्यूज अरेबियाला’ दिलेल्या मुलाखतीत त्यांनी विमानतातील घटनाक्रम सांगितला. त्यांनी सांगितलं की, टेकऑफनंतर दोन तासांनी कॅप्टन स्मित मच्छार हे लँडिंगची वेळ आणि इंधनाची माहिती घेत होते. त्याचवेळी त्यांच्यावर पाठीमागून हल्ला झाला. त्यामुळे स्मित घाबरून गेले. परंतु वारंवार हल्ले होऊ लागल्याने त्यांनी पाठीमागे वळून पाहिलं. त्यावेळी माथेफिरू को-पायलट हल्ला करत असल्याचे दिसून आले.  खरंतर उड्डाण व्यवस्थित झालं होतं. कोणत्याही प्रकारे अपघाताची शक्यता नव्हती. परंतु माथेफिरूच्या मनात वेगळंच काहीतरी सुरू होतं. माथेफिरू को-पायलट आणि स्मित माच्छर पहिल्यांदा एकत्र प्रवास करत होते. मच्छार यांनी पुढे सांगितले की, उड्डाणानंतर दुसरा को-पायलट दोन तासांनी कॉकपिटमध्ये आला. त्यावेळीच माथेफिरू को-पायलट शौचालयात गेला होता. पुढे माथेफिरू को-पायलटने दुसऱ्या कॅप्टनला कॉकपिटमधून बाहेर जाण्यास सांगितलं. परंतु  माथेफिरू को-पायलटची विनंती खटकली होती, असे मच्छार यांनी सांगितले.

Loading...

को-पायलटने हल्ला करण्यास सुरूवात केली, त्यावेळी मच्छार हे जागेवर बसून लँडिंगची वेळ आणि इंधनाची माहिती कॉम्प्युटरवर पाहत होते. को-पायलटने मच्छार यांच्या डोक्यात जोरात प्रहार केला. हा फटका डोक्याला जोरदार बसला. खरंतर सुरुवातीला कॉकपिटचा एखादा भाग लागल्याचे वाटले. परंतु पुढील क्षणात पाठीमागून त्यांच्यावर हल्ला होत असल्याचे लक्षात आले. डोक्यावर जोरात हल्ला झाल्यामुळे त्यांना दिसेनासे झाले होते. डोळ्यावर अंधारी आली होती. मच्छार यांनी सीटबेल्ट काढून हल्ला रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या हाताला दुखापत झाली. त्यांनी तातडीने को-पायलटला आवाज दिला.

मच्छार म्हणाले की, ते दुसऱ्या को-पायलटला आवाज देत होते. दरवाजा उघडण्याचे बटण दाबत होते. डोळ्यावर अंधारी येत होती. नंतर दरवाजा उघडला. त्यावेळी त्याने प्रवाशांना ठार मारण्याची धमकी दिली. नंतर दरवाजा पुन्हा बंद झाला. इंजिनचा वेग कमी झाल्याचा आवाज झाला. अनुभवावरून विमान खाली कोसळत असल्याचे त्यांना भासले. कॅप्टन मच्छार यांनी पुढे सांगितलं की, त्यांनी जखमी अवस्थेत स्वत: कॉकपिटच्या दारात जाण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न यशस्वी ठरला’.  हल्ल्यानंतर मच्छार यांनी वाटलं की, काही तर केलं पाहिजे. तू असा मरणार नाही’. मच्छार यांनी पुढील क्षणात माथेफिरू को-पायलटचा उद्देश हाणून पाडला. तर मच्छार यांनी आपत्कालीन परिस्थितीत विमानाचा ताबा घेणाऱ्या दुसऱ्या को-पायलटचं कौतुक केलं. त्याचं सहकार्य आयुष्यभर लक्षात राहील, असे त्यांनी म्हटलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us