जगाला ज्याची प्रतिक्षा तो मोठा क्षण आलाच, अमेरिकेने इराणच्या केल्या 4 अटी मान्य, युद्धविराम..
इराण आणि अमेरिका युद्धात मोठी आनंदाची बातमी पुढे येत आहे. जगाला ज्याची प्रतिक्षा तो क्षण अत्यंत जवळ आल्याचे बघायला मिळत आहे. अनेक मुद्द्यात इराण आणि अमेरिका यांच्यात सहमती झाली. ज्यामुळे कधीही करार अंतिम होऊ शकतात.

इराण अमेरिका युद्धाला 3 महिने पूर्ण झाली. या युद्धाचा फटका जगातील सर्व देशांना बसता. फक्त इराणचेच नाही तर अमेरिकेचेही मोठे नुकसान झाले. आता जगाला ज्याची प्रतिक्षा तिच मोठी बातमी पुढे येत आहे. इराण आणि अमेरिका युद्ध थांबू शकते. काही गोष्टींमध्ये इराण आणि अमेरिका या दोन्ही देशांची सहमती झाली. अमेरिकेने काही अटी मान्य केल्याचे बघायला मिळतंय.अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांनी गुरुवारी सांगितले की, इराणसोबत सुरू असलेल्या वाटाघाटींमध्ये खूप जास्त चांगली प्रगती झाली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रस्तावित या कराराला अद्याप मंजुरी दिलेली नाही. जे.डी. व्हान्स यांनी म्हटले की, काही मुद्द्यात चांगली चर्चा झाली. डोनाल्ड ट्रम्प या प्रस्तावाला मंजुरी देऊ शकतात. इराण आणि अमेरिका युद्ध थांबले पाहिजे, याकरिता जगाचा दबाव आहे. होर्मुज खाडीतील बंदी हटवून बारूदी सुरंगे काढण्यास इराण तयार आहे. दुसरीकडे अमेरिकाही इराणजवळची नाकेबंदी काढण्यास तयार आहे.
इराणने केल्या अमेरिकेच्या या अटी मान्य-
होर्मुजची सामुद्रधुनी खुली करून सुरुंग हटवू.
अणुबॉम्ब बनवण्याची कोणतीही इच्छा नाही. तसे वचनही देऊ.
अत्यधिक संवर्धित युरेनियम (HEU) सोडण्याबाबत वाटाघाटी सुरू करू.
इराणच्या या अटी अमेरिकेने केल्या मान्य..
इराणच्या तेलाच्या किमतींसह सर्व निर्बंध शिथिल करेल.
गोठवलेला निधी सोडवण्यासाठी वाटाघाटी करेल.
लेबनॉनमधील युद्ध संपवण्यासाठी मदत करेल.
इराणजवळील अमेरिकेची तटबंदी उठवणार
नव्या प्रस्तावानुसार, दोन्ही देशांची जवळपास मुद्द्यांवर सहमती झाली आहे. ज्यामुळे युद्ध लवकर संपण्याची शक्यता आहे. या शांतता करारापासून अमेरिकेने इस्त्रायलला दूर ठेवले. पहिल्यांदा पाकिस्तान या शांतता करारात मध्यस्थीची भूमिका निभावत होता. मात्र, त्यांच्या मध्यस्थीला मोठे अपयश मिळाले.
अमेरिकेचाच खेळ पाकिस्तान करत असल्याचे लक्षात येताच अमेरिकेने पाकिस्तानला यापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिकेने इस्त्रायलसोबतच मिळून मोठा हल्ला इराणवर केला. इराणने या दोन्ही देशांना सळो की पळो करून सोडले. एखाद महिना युद्ध चालेल हा अमेरिकेचा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्षात सर्व डावच उलटा पडला.