पाकिस्तानमध्ये आणखी एक सर्जिकल स्ट्राईक; इराणच्या बहादूर जवानांनी आपल्या साथीदारांना सोडवलं

| Updated on: Feb 04, 2021 | 10:01 PM

पाकिस्तानमधील जैश-अल अदल या दहशतवादी संघटननेने तीन वर्षांपूर्वी इराणी सैन्यातील या दोन जवानांचे अपहरण केले होते. | Surgical strike

पाकिस्तानमध्ये आणखी एक सर्जिकल स्ट्राईक; इराणच्या बहादूर जवानांनी आपल्या साथीदारांना सोडवलं
पाकिस्तानच्या नैऋत्य सीमेवरील परिसरात जैश-अल अदल ही संघटनेचा दबदबा आहे. मात्र, इराणच्या सैन्याने याच भागात रात्रीच्या अंधारात सर्जिकल स्ट्राईक करून आपल्या साथीदारांना सुखरुपपणे परत आणले.
Follow us on

लाहोर: इराणने गुरुवारी पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक (Surgical strike) केल्याची माहिती समोर येत आहे. इराणच्या रेव्होल्यूशनरी गार्डसनी 2 फेब्रुवारीला रात्री पाकिस्तानच्या हद्दीत शिरुन हा सर्जिकल स्ट्राईक केला. यावेळी इराणने दहशतवाद्यांच्या ताब्यात असलेल्या आपल्या दोन जवानांना सोडवून आणले. (Iran frees two soldiers kidnapped in Pakistan)

पाकिस्तानमधील जैश-अल अदल या दहशतवादी संघटननेने तीन वर्षांपूर्वी इराणी सैन्यातील या दोन जवानांचे अपहरण केले होते. पाकिस्तानच्या नैऋत्य सीमेवरील परिसरात जैश-अल अदल ही संघटनेचा दबदबा आहे. मात्र, इराणच्या सैन्याने याच भागात रात्रीच्या अंधारात सर्जिकल स्ट्राईक करून आपल्या साथीदारांना सुखरुपपणे परत आणले. 3 फेब्रुवारीला इराणकडून सर्जिकल स्ट्राईक यशस्वी ठरल्याचे जाहीर करण्यात आले.

2018 मध्ये सैनिकांचे अपहरण

जैश-उल-अदल या दहशतवादी संघटनेने 2018 साली इराणच्या 14 सैनिकांचे अपहरण केले होते. या सैनिकांच्या सुटकेसाठी इराण आणि पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी समिती बनवली होती. त्यानंतर 15 नोव्हेंबर 2018 रोजी पाच सैनिकांची सुटका करण्यात आली. 21 मार्च 2019 ला पाकिस्तानी लष्कराने चार इराणी सैनिकांची सुटका केली होती. मात्र, उर्वरित जवान दहशतवाद्यांच्या ताब्यात होते. त्यामुळे इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डसनी गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर ऑपरेशन करुन दोन जवानांची सुटका केली.

यापूर्वी कोणी केलेत सर्जिकल स्ट्राईक?

पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक करणारा इराण हा तिसरा देश आहे. अमेरिकेने 2 मे 2011 रोजी ओसामा बिन लादेनला पकडण्यासाठी अबोटाबाद येथे सर्जिकल स्ट्राईक केला होता. तर डिसेंबर 2016 मध्ये भारताने पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक करुन दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी 26 फेब्रुवारीला बालाकोटमध्ये भारताकडून एअर स्ट्राईक करण्यात आला होता.

संबंधित बातम्या:

26 वर्षांची हुकूमशाही ते एका महिलेनं आणलेली लोकशाही, पुन्हा सैन्यअधिपत्याखाली गेलेल्या म्यानमारची सगळी कहाणी!

पत्रकाराचं डोकं कलम करणारा दहशतवादी पाकिस्तानचा पाहुणा, अमेरिकेने लाथाडलं

श्रीलंकेत भारताला मोठा झटका; चीनसाठी आनंदाची खबर

(Iran frees two soldiers kidnapped in Pakistan)