जगाला ज्याची भीती तीच धमकी इराणकडून, थेट नव्या युद्धाची धमकी, मोठी खळबळ, थेट 5 …

इराण आणि अमेरिका युद्धात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यामध्येच आता इराणने मोठी धमकी जगाला दिली. अमेरिकेसोबत सुरू असलेल्या युद्धात फक्त अमेरिकेलाच नाही तर थेट जगाला धमकी इराणकडून देण्यात आली.

जगाला ज्याची भीती तीच धमकी इराणकडून, थेट नव्या युद्धाची धमकी, मोठी खळबळ, थेट 5 ...
America and Iran
| Updated on: Jun 06, 2026 | 7:10 PM

इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध भडकले आहे. युद्धविरामाची चर्चा सुरू आहे. मात्र, या चर्चेला यश मिळाले नाही. काही देश या युद्धविरामात मध्यस्थी करत आहे. पण अमेरिका आणि इराण हे दोन्ही देश काही अटीवर तटस्थ आहेत. यामुळे युद्धातून मार्ग निघू शकत नाही. त्यामध्येच होर्मुज खाडी बंद असल्याने जग जैरीस आले. अमेरिकेने होर्मुज खाडी भोवती मोठी नाकेबंदी केली. इराणच्या बंदरातून जहाज बाहेर पडत नाहीये. इराणचे स्पष्ट म्हणणे आहे की, होर्मुज खाडीवर फक्त आमचा आणि ओमानचा अधिकार आहे. होर्मुज खाडीवर अमेरिकेला नियंत्रण पाहिजे. तेहरानने राजनयिकतेला मोठा धक्का दिला आहे. इराण आणि अमेरिका युद्ध थांबावे, ही जगाची इच्छा आहे. मात्र, इराणने आपल्या लघु युद्ध योजनेची अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली.

नाटो आणि पेंटागॉनची युद्धनीती आधीच अयशस्वी झाली आहे. राजनैतिक डावपेचही अयशस्वी ठरले आहेत. अरब देश धोक्यात आहेत. आता इराणकडून थेट संकेत देण्यात आले की, जर अमेरिकेने आता नाकेबंदी उठवली नाही तर पाच वेगवेगळ्या ठिकाणी इराण नाकेबंदी करण्यास तयार आहे. पर्शियन आखात, ओमानचे आखात, एडनचे आखात, बाब अल-मंदेब आणि होर्मुज खाडीमध्येही नाकेबंदी केली जाईल.

अमेरिकेला हा शेवटचा इशारा इराणकडून देण्यात आला. जर अमेरिकेने इराण जवळची नाकेबंदी उठवली नाही तर मोठी कारवाई इराण करू शकतो. या पाच ठिकाणी इराणने जर नाकेबंदी केली तर जगाच्या तोंडचे पाणी पळेल. नुसते पाणीच नाही तर जगात हाहाकार उडेल. ही मोठी धमकी एका अमेरिकेसाठी नाही तर जगासाठी म्हणावी लागणार आहे. आमचे तेल रोखले तर आम्ही जागतिक अर्थव्यवस्था संपू अशी थेट धमकी इराणने दिली.

अरबमधून संपूर्ण जगाला जोडणारे रस्ते इराण बंद करू शकतो. दीर्घकाळ चाललेल्या निर्बंधांमुळे इराण आता तणावात आहे. अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे 67 दशलक्ष बॅरल तेल ओमानच्या आखातात त्यांचे अडकून पडले आहे. हेच नाही तर कच्चे तेल पाईपलाईनवर लोड येत असल्याने समुद्रात सोडण्याची वेळ त्यांच्यावर आली. तेल शुद्धीकरणाचे उत्पादन सुरू आहे, परंतु साठवण क्षमता संपत चालली आहे. काही जहाजे होर्मुज खाडी ओलांडताना टोल इराणला देत आहेत. मात्र, अमेरिकेकडून ती जहाजे रोखली जात आहेत.

Follow Us