आता इराणची थेट दक्षिण कोरियाला मोठी धमकी, तुम्ही जर अमेरिकेची मदत केली तर आम्ही…, तणाव वाढला

मोठी बातमी समोर येत आहे, अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरूच आहे. दरम्यान आता त्यानंतर इराणकडून थेट दक्षिण कोरियाला धमकी देण्यात आली आहे. अमेरिकेची मदत करू नका असं इराणने म्हटलं आहे.

आता इराणची थेट दक्षिण कोरियाला मोठी धमकी, तुम्ही जर अमेरिकेची मदत केली तर आम्ही..., तणाव वाढला
इराणची अमेरिकेला धमकी
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 07, 2026 | 5:01 PM

अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरूच आहे, इराणविरोधात मदत करावी म्हणून सध्या अमेरिकेकडून अनेक देशांवर दबाव निर्माण केला जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट इशारा दिला आहे, जे देश इराणची मदत करतील त्या देशांना मोठं नुकसान सहन करावं लागेल. तर दुसरीकडे आता इराणने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. इराणकडून देखील अमेरिकेला मदत करत असलेल्या आखाती देशांना स्पष्ट शब्दात इशारा देण्यात आला आहे. काही देशांवर तर इराणने थेट हल्ले देखील केले आहेत. इराणच्या हल्ल्यांमध्ये या देशांचं प्रचंड नुकसान झालं आहे. दरम्यान त्यानंतर आता इराणकडून दक्षिण कोरियाला थेट धमकी देण्यात आली आहे.

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता इस्माइल बघाई यांनी अमेरिका आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर थेट दक्षिण कोरियाला इशारा दिला आहे. इराण आणि दक्षिण कोरियामध्ये गेल्या 64 वर्षांपेक्षा अधिक जुने संबंध आहेत. दोन्ही देशांनी एकमेकांचे हीतसंबंध जपले आहेत. इराणकडून कायमच आपल्या मित्र देशांच्या हिताला प्राधान्य देण्यात आलं आहे. मात्र सध्या इराणचा अमेरिकेसोबत संघर्ष सुरू आहे. आमचं सैन्य पूर्ण ताकदीने अमेरिकेकडून सुरू असलेल्या कारवायांचा सामना करत आहे. मात्र अशा स्थितीमध्ये फारसच्या खाडीमध्ये किंवा स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये तिसऱ्या कोणत्याही देशाने सैन्य तैनात केलं तर आम्ही त्याला आमच्याविरोधातील कारवाई मानू तसेच संबंधित देश हा आमच्या शत्रू राष्ट्रांना मदत करत आहे, असं देखील मानले जाईल, त्याचे परिणाम गंभीर होतील, असा थेट इशाराच इराणकडून कोरियाला देण्यात आला आहे.

दरम्यान आमचा अमेरिकेसोबत संघर्ष सुरूच आहे. आम्ही अमेरिकेच्या पुढे कधीही झुकणार नाही, आम्ही माघार घेणार नाही. आमचे सैन्य संपूर्ण ताकदीने अमेरिकेचा सामना करतील, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. 28 फेब्रुवारी रोजी इस्त्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर भीषण हल्ला करण्यात आला होता, या हल्ल्यानंतर युद्धाला सुरुवात झाली, दरम्यान मध्यंतरी युद्धविराम देखील झाला होता, मात्र पुन्हा एकदा इराण आणि अमेरिकेमधील युद्ध चांगलंच पेटलं आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us