शेवटचे सांगत आहोत, सुधारा, या अरब देशाला उद्ध्वस्त करण्याच्या तयारीत इराण, थेट…
इराण आणि अमेरिका युद्ध भयंकर स्थितीत आहे. त्यामध्येच इराणकडून हैराण करणारा इशारा देण्यात आला. 28 फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या या युद्धात पहिल्यांदाच थेटपणे एका आखाती देशाचे नाव घेत इराणकडून मोठी धमकी देण्यात आली.

मध्य पूर्वेत युद्ध भडकले आहे. एका घातक ठिकाणी युद्ध पोहोचले आहे. गेल्या एक महिन्यापासून युद्ध सुरू आहे. मात्र, यादरम्यान ज्या ज्या आखाती देशात अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, अशा ठिकाणीनी इराणकडून हल्ले केले गेले. यासोबतच अमेरिकन दूतावासाला टार्गेट करूनही हल्ले झाले. इराणकडून थेट आखाती देशांवर हल्ले करणे टाळले. पण आता आखातीमधील एक देश इराणच्या थेटपणे निशाण्यावर आहे. आता आमचा संयम संपत जात असल्याचे इराणने म्हटले. विशेष म्हणजे इराणच्या निशाण्यावर कतार किंवा कुवेत नाही तर थेट अरब अमिराती अर्थात युएई आहे. इराणकडून युएईवर गंभीर आरोप करण्यात आली. तेहरानच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बोलताना म्हटले की, इराणला आता विश्वास झाला की, युएई या युद्धात फक्त बघ्याची भूमिका घेत नाही, तो युद्धात थेटपणे सक्रिय आहे.
युएईने फक्त अमेरिका आणि इस्त्रायलला आपल्या सैन्य ठिकाणांचा वापर करू दिला नाही तर त्यांनी एअर फॅसिलिटी ऑपरेशन करण्यासही परवानगी दिली. सध्याची स्थिती बघता इराणचा संयम संपेल, असेही त्यांनी म्हटले. इराणकडून देण्यात आलेला हा इशारा अत्यंत भयंकर आहे. त्यांनी स्पष्ट सांगितले की, त्यांच्या जमिनी ताब्यात घेण्याचा किंवा त्यांच्या जमिनीवर उतरून काही झाले तर थेटपणे त्या संबंधित देशावर हल्ला केला जाईल.
इराणकडून युएईला देण्यात आलेला हा इशारा भयंकर आहे. कारण आतापर्यंत इराणकडून थेट आखाती देशांवर हल्ले केले गेले नाहीत. पण आता स्पष्ट तसे संकेत देण्यात आली. अमेरिकेकडून होर्मुज खाडीच्या आसपासचे इराणचे खार्ग आणि केशम दीपांवर कब्जा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी युएईच्या भूमिकेवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यामध्येच आता थेट इशारा इराणकडून देण्यात आला.
आखाती देश युद्धापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, युएईच्या भूमिकेवर सुरूवातीपासूनच इराणला संशय आहे. त्यामध्येच त्यावर बोलताना इराण दिसला आहे. जर खरोखरच इराणकडून युएईवर हल्ला करण्यात आला तर मोठी खळबळ उडेल. इराण, इस्त्रायल आणि अमेरिका युद्धाचा सर्वात जास्त फटका जर कोणाला बसत असेल तर ते आखाती देश आहेत. आखाती देशातील तेल रिफायनरी आणि गॅस प्रकल्प संकटात आहेत.