मोठी बातमी! युद्धात इराणची अत्यंत मोठी घोषणा, थेट होर्मुज खाडी…
इराण आणि अमेरिका युद्ध एका घातक टप्प्यात आले. मोठे हल्ले केले जात आहेत. इराणने होर्मुज खाडी बंद केली. होर्मुज खाडी बंद असल्याने अनेक देश संकटात आहेत. यादरम्यान अत्यंत मोठी घोषणा इराणकडून करण्यात आली.

इराण आणि अमेरिका युद्ध भयंकर होत असतानाच मोठा इशारा दिला जात आहे. 48 तासाचा वेळ होर्मुज खाडी खुली करण्याकरिता अमेरिकेने इराणला दिला. मात्र, स्थिती अधिक घातक होत आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेकडून मोठे हल्ले इराणवर केले जात आहेत. युद्धबंदी करार करण्याकरिता मोठा दबाव आहे. होर्मुज खाडी इराणकडून बंद करण्यात आल्याने अनेक देश संकटात आहेत. यादरम्यानच आता इराणकडून होर्मुज खाडी पूर्णपणे खुली करण्यात आली. पण थांबा थांबा सर्वांसाठी इराणकडून होर्मुज खाडी खुली करण्यात आली नाही. फक्त इराकसाठी पूर्णपणे इराणकडून होर्मुज खाडी खुली करण्यात आली. युद्धात इराक इराणसोबत उभा असल्याने आम्ही आमच्या मित्रावर कोणतेही निर्बंध लादत नाहीत आणि इराककरिता पूर्ण होर्मुज खाडी खुली आहे.
इराणकडून ही अत्यंत मोठी घोषणा करण्यात आली. इतरही काही देशांचे जहाज होर्मुजमधून जात आहेत. मात्र, आता पूर्ण सूट फक्त आणि फक्त इराकलाच मिळाली आहे. अल जजीराच्या रिपोर्टनुसार, इराकला होर्मुज खाडी वापरण्याची परवानगी इराकने दिली. IRGC चे प्रवक्ते इब्राहिम जोल्फघारी यांनी इराकच्या लोकांचे काैतुक करत म्हटले की, युद्धात इराणच्या लोकांसोबत इराक उभा आहे.
त्यामुळे आम्ही इराकला होर्मुज खाडी खुली केली. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे प्रतिबंध नसणार आहेत. इब्राहिम यांनी पुढे म्हटले की, अमेरिका आणि इस्त्रायलकडून कोणताही विचार करून हल्ले केले जात नाहीत. सर्वसामान्य लोक, महिला आणि लहान मुलांना निशाना बनून हल्ले केले जात आहेत. शाळा, हॉस्पिटल आणि सार्वजनिक संस्थांवर हल्ला करण्यात आला.
युद्धादरम्यान ही मोठी घोषणा इराणकडून करण्यात आली. होर्मुज खाडी खुली करण्याकरिता इराणवर अमेरिका दबाव टाकत आहे. पण इराण झुकताना दिसत नाहीये. पुढील दोन ते तीन आठवड्यात युद्ध संपण्याचे संकेत आहेत. मात्र, त्यापूर्वी मोठे हल्ले केले जात आहेत. युएईला अत्यंत मोठा इशारा इराणकडून देण्यात आला. या युद्धात युएई अमेरिका आणि इस्त्रायलला मदत करत असल्याचे सांगितले जात आहे.