माझे नेतान्याहूंसोबत अफेअर होते, डॉ.रूथ बार यांनी सोडले मौन, त्या चित्रफितीने उडाली होती खळबळ
१९९३ मध्ये बेंजामिन नेतान्याहू यांनी स्वत:च आपल्या विवाहबाह्य संबंधांची जाहीर कबुली दिल्याने खळबळ उडाली होती. त्यावेळी त्यांच्या राजकीय विरोधकांनी या प्रकरणाचा वापर प्रचारात केल्याने खळबळ उडाली होती.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी असलेल्या अनैतिक संबंधावर डॉ.रुथ बार या महिलेने प्रथमच मौन सोडले आहे. डॉ.रुथ बार ही महिला साल १९९३ च्या स्कँडलमध्ये वादाच्या केंद्र स्थानी आली होती. बेंजामिन नेतान्याहू यांनी आपले या महिलेशी संबंध असल्याचे जाहीर केल्याने राजकारणात खळबळ उडाली होती. आता पुन्हा ही महिला केंद्रस्थानी आली आहे.
डॉ.रुथ बार ही महिलेशी असलेल्या संबंधानंतर बेंजामिन नेतान्याहू यांनी १४ जानेवारी १९९३ रोजी इस्रायली चॅनल- १ वर जाहीर आपल्या अफेअरची जाहीर कबुली दिली होती. त्यामुळे लिकूड पार्टीमध्येही त्यांच्या राजकारणाची सुरुवातच खळबळ झाली होती. लिकूड पार्टीचे नेतृत्व करताना डॉ.रुथ बार यांनी बेंजामिन यांच्या रणनितीक सल्लागार म्हणून काम केले होते. त्यानंतर बेंजामिन यांनी डॉ. रुथ बार यांच्यावर आपल्याला ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला आहे.
त्यावेळी बेंजामिन नेतान्याहू यांनी ‘चॅनेल १’ च्या स्टुडिओत पोहोचले. न्यूज अँकर याकोव्ह अहीमेइर आणि वार्ताहर उरी कोहेन-अहारोनोव्ह त्यांची त्यावेळी वाट पाहत होते आणि त्यांनी थेट लाईव्ह टेलिव्हिजनवर आपल्या अनैतिक संबंधाची कबूली देत आपण आपल्या पत्नीची फसवणूक केल्याचे म्हटले होते.
नेतान्याहूंच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला धोका
नेतृत्वाच्या शर्यतीत नेतान्याहू यांची आगेकूच सुरू असतानाच, त्यांचे वैयक्तिक आयुष्य अचानक चर्चेत आले होते. एका व्यक्तीने त्यांच्या घरी फोन करून बेंजामिन यांची पत्नी सारा यांना,नेतान्याहू यांचे ‘स्ट्रॅटेजिक ॲडव्हायझर’शी अनैतिक संबंध असल्याचे सांगितले होते. नेतान्याहू यांनी लिकुड पक्षाच्या राजकीय नेतृत्वाच्या शर्यतीतून माघार न घेतल्यास, या संबंधांचे पुरावे असलेली टेप सार्वजनिक करण्याची धमकी त्या व्यक्तीने दिली होती.
..तरीही नेतृत्व मिळाले
त्या काळात, १९९२ च्या निवडणुकीत यित्झाक राबिन यांनी लिकुड पक्षाचा पराभव केल्यानंतर,लिकुड पक्ष यित्झाक शामिर यांच्यानंतर पक्षाचा नवा उत्तराधिकारी कोण ? याची चर्चा सुरु असताना नेतृत्वाच्या या शर्यतीत नेतान्याहू यांनी त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी डेव्हिड लेव्ही यांना मागे टाकत पक्षाचे नेतृत्व मिळवले होते.
‘ती’ चित्रफित कधीच समोर आली नाही..
नेतान्याहू यांनी त्यांचे प्रतीस्पर्धी डेव्हिड लेव्ही यांच्या नावाचा उल्लेख न करता ‘लिकुड’ पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने आपल्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. त्यावेळी आपण गुन्हेगारांच्या टोळीने वेढले गेलो आहोत, असेही त्यांनी म्हटले होते. या कबुलीमुळे संपूर्ण इस्रायलमध्ये एकच खळबळ उडाली होती.बेंजामिन नेत्यान्याहू यांची आणि डॉ. रुथ बार यांची एक चित्रफित आपल्याकडे असल्याचा दावा त्यांच्या विरोधकाने केला होतो. परंतू ही टेप कधीच समोर आली नाही.
रुथ बार कोण आहेत?
सोशल मीडिया आणि आजचे डिजिटल युग अस्तित्वात येण्यापूर्वी मानसशास्त्रज्ञ आणि धोरणात्मक सल्लागार म्हणून डॉ.रुथ बार यांनी काम करणे सुरु केले होता. पुढे रुथ बार यांनी श्लोमो लाहत, झ्वी बार, एहुद बराक, एहुद ओल्मर्ट, डॅन मेरिडोर आणि गबी अश्केनाझी यांसारख्या इस्रायलमधील वरिष्ठ राजकीय नेत्यांसोबत काम केले होते. त्यानंतर त्या चर्चेतून अचानक नाहीशा झाल्या आणि त्यांचा व्यावसायिक जीवन जगत होत्या.