भयंकर घडलं, अचानक बॉम्ब वर्षाव अन् मिसाईल हल्ले; इस्त्रायलच्या हल्ल्यात 27 जण ठार
इस्त्रायलने दक्षिण लेबनॉनवर अचानक बॉम्ब वर्षाव आणि मिसाईल हल्ले केले. तर इस्त्रायलच्या हल्ल्यात 27 जण ठार झाले. या हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

इस्त्रायलने पुन्हा एकदा दक्षिण लेबनॉनवर भीषण हल्ला केला आहे. इस्त्रायलच्या हल्ल्याने एकच खळबळ उडाली आहे. मागील तीन दिवसांत दक्षिण लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत 27 जण ठार झाले आहेत. तर 69 जण जखमी झाले आहेत. तर जखमींमध्ये मुले, महिला आणि मेडिकलचा स्फाफचाही समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इस्त्रायल आणि दक्षिण लेबनॉनमध्ये भीषण युद्ध (War) सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासून दोन्ही देशात वादाला सुरुवात झाली. इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यामुळे आतापर्यंत 4,381 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 12,402 जण जखमी झाले आहेत. 8 ऑक्टोबर 2023 पासून आतापर्यंत इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या नागरिकांची संख्या 8,948 इतकी झाली आहे. तर 30,638 जण जखमी झाले आहेत. इस्त्रायल संरक्षण दलाने दक्षिण लेबनॉनवर कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे प्रत्युत्तर म्हणून हल्ला केल्याचा इस्त्रायलचा दावा आहे. हिज्बुल्लाहच्या दहशतवाद्यांनी आयडीएफच्या सैनिकांवर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हिज्बुल्लाहने कराराचं उल्लंघन केल्याचा आरोप इस्त्रायलने केला.
🎯STRUCK IN RESPONSE TO HEZBOLLAH VIOLATION: Several Hezbollah terrorist infrastructure sites across southern Lebanon, including a weapons storage facility.
Additionally, the IDF struck terrorists who were identified transferring weapons in the area of Kfar Reman, in order to…
— Israel Defense Forces (@IDF) September 7, 2026
हल्ल्यानंतर आयडीएफने दिलं स्पष्टीकरण
आयडीएफने सोशल मीडियावर (social Media) पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. हिज्बुल्लाहच्या दहशतवाद्यांनी इस्त्रायलच्या संरक्षण दलाच्या सैनिकांवर दोन ड्रोन टाकले. या हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून आयडीएफच्या सैनिकांनी प्रत्युत्तर दिलं. या घटनेत आयडीएफचे सैनिक जखमी झालेले नाहीत. आता समोरून हल्ला झाल्यानंतर आता आयडीएफ हल्ला करण्याची तयारी करत आहे. कराराचं उल्लंघन केल्याप्रकरणी आयडीफचे सैनिक हिज्बुल्लाहच्या दहशतवाद्यांच्या शस्त्रसाठा स्थळांना लक्ष्य करत आहे. हिज्बुल्लाहाचे दहशतवादी या शस्त्रसाठांचा वापर हा आयडीएफचे सैनिक आणि इस्त्रायली नागरिकांवर हल्ला करण्यासाठी वापर करत होते. त्यामुळे इस्त्रायल हिज्बुल्लाहवर हल्ला करत आहे.
आयडीएफच्या (IDF) दाव्यानुसार, हिज्बुल्लाहच्या ठिकाणांवर हल्ले करून धोके कमी करत आहोत. हिज्बुल्लाहच्या दहशतवाद्यांनी हल्ला केल्याने प्रत्युत्तर आणि कारवाई म्हणून हल्ला केलाय. इस्त्रायलने मागच्या आठवड्यात देखील हिज्बुल्लाहच्या अंडरग्राउंड ठिकाणांवर हल्ला केला होता. इस्त्रायलने दक्षिण लेबनॉनवर केलेल्या हल्ल्याची जोरदार चर्चा होत आहे.