इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेत खळबळ, व्हाईट हाऊस हादरले, थेट डोनाल्ड ट्रम्प यांचीच..

अमेरिका आणि इराण युद्धाला एक महिन्यापेक्षा जास्त काळ झाला. मात्र, युद्ध काही थांबत नाही. या युद्धाचा फटका जगातील सर्वच देशांना बसत आहे. युद्ध थांबवण्याची मागणी अमेरिकेतूनही होत आहे. यादरम्यानच मोठी धोक्याची घंटा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकरिता आहे.

इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेत खळबळ, व्हाईट हाऊस हादरले, थेट डोनाल्ड ट्रम्प यांचीच..
Donald Trump
| Updated on: Apr 05, 2026 | 9:33 AM

इराण युद्धात अमेरिकेला फार काही यश मिळत नाहीये. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला युद्धीबंदीचा करार करण्याकरिता एक प्रस्ताव दिला. तो प्रस्ताव इराणकडून नाकारण्यात आला. इराणवर भीषण हल्ले होत आहेत. इराण कडूनही ज्या ज्या देशात अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, अशा ठिकाणी हल्ले केले जात आहेत. इराणने युद्धात अमेरिकेला सळो की पळो करून सोडले. इराण युद्ध सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेकडून धक्का बसताना दिसत आहे. परिस्थिती डोनाल्ड ट्रम्प यांच्या नियंत्रणाच्या बाहेर जाताना दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. ‘रिजीम चेंज’ बद्दल डोनाल्ड ट्रम्प बोलताना दिसले. त्याबद्दलचा आता दबाव वाढताना दिसत आहे.

मुळात म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अगोदरच अमेरिकेची जनता नाराज आहे. 60 टक्के अमेरिकन लोकांना वाटते की, युद्ध नको. डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध वाढताना दिसत आहे. अटॉर्नी जनरल पाम बॉन्डीला हटवल्यानंतर व्हाईट हाऊसमध्ये मोठ्या प्रमाणात बदलाची चर्चा सुरू आहे. रिपोर्टनुसार, डोनाल्ड ट्रम्प आपल्या कॅबिनेटमधील फेरबदलाचा गंभीरतेने विचार करत आहेत.

इराणसोबतचे युद्ध त्यांच्यावर भारी पडताना दिसत आहे. इराणसोबतच्या युद्धाचा थेटपणे अमेरिकन नागरिकांना फटका बसताना दिसत आहे. या युद्धामुळे अमेरिकेत महागाई वाढली आहे. यासोबतच गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ होत आहे. यामुळे लोक चिंतेत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांची लोकप्रियता कमी होत आहे. व्हाईट हाऊसमध्ये घडामोडींना वेग येत असल्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्याकरिता ही धोक्याची घंटा आहे. काही सहकारी उघडपणे भूमिका घेताना दिसत आहेत.

व्हाईट हाऊसमध्ये अशीही चर्चा आहे की, स्थिती इतकी पण नक्कीच चांगली नाही, जितकी बाहेर दाखवली जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या जनतेला संबोधित करत एक भाषण केले. पण त्याचे पाहिजे तेवढे सकारात्मक परिणाम जनतेवर बघायला मिळाले नाहीत. रिपोर्टनुसार, जर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या टीममध्ये काही बदल केले तर परिस्थिती नियंत्रणात येणार का? अमेरिकेच्या 60 टक्के लोकांना वाटते की, इराणसोबत युद्ध नको. युद्ध अधिक काळ चालले तर त्याचा आर्थिक भार शेवटी अमेरिकेच्या जनतेवरच पडणार आहे.

Follow Us