भारतावरील टॅरिफबद्दल मोठी अपडेट, मार्को रुबिओ यांचा थेट मोठा खुलासा..
अमेरिका भारतासह चीनवर टॅरिफ लावण्याच्या तयारीत होती. मात्र, त्यानंतर त्यांनी आपला निर्णय बदलला. जगात ऊर्जेचे मोठे संकट आहे. हुतींकडून साैदी अरेबियावर हल्ले केले जात आहेत. यासोबतच होर्मुज खाडीही अशांत आहे.

रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या सर्व देशांवर मोठे निर्बंध लादण्याच्या तयारीत अमेरिका होती. तसे विधेयकही त्यांच्या संसदेत मंजूर करण्यात आले. मात्र, त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी पलटी मारली. आपण रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर टॅरिफ लावणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारत हा रशियाकडून नंबर दोनचा तेल खरेदी करणारा देश आहे. जगात चीन हा सर्वाधिक रशियाकडून तेल खरेदी करणारा देश आहे. त्यातच आता अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी मोठे विधान केले. त्यांनी म्हटले की, रशिया आणि भारतासारख्या भागीदार देशांवर मोठ्या प्रमाणावर नवीन निर्बंध लादल्यास जागतिक अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतो, याचे मूल्यांकन करण्यासाठी ट्रम्प प्रशासन करत आहे. याकरिता 60 दिवस आम्ही विचार करणार आहोत.
या आठवड्यात ट्रम्प प्रशासनाने लिंडसे ग्रॅहम ॲक्ट अंतर्गत रशियावर लादलेल्या निर्बंधांमधून काही सवलती देण्याचा निर्णय घेतला आहे. मार्को रुबिओ यांनी म्हटले की, युक्रेनमधील युद्ध, इराण संघर्ष आणि साैदी अरेबियावर होणारे हुती गटाकडून हल्ले ज्यामुळ जागतिक ऊर्जा बाजारात किंमतीमध्ये सतत चढउतार बघायला मिळतोय. अस्थिर होण्याची मोठी समस्या आहे.
उझबेकिस्तान आणि भारताच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी रुबिओ यांनी म्हटले की, मला वाटते की, जेव्हा हे विधेयक मंजूर करण्यात आले, तेव्हा त्यात सवलत समाविष्ट करण्यामागचे एक कारण हे होते की, या विषयाचा अभ्यास करण्यासाठी वेळ लागणार होता. त्यामुळे त्यावर विचार करण्यासाठी आम्ही वेळ घेतला.
भारतावर मोठ्या टॅरिफचे संकट होते. भारतासह चीनवरही टॅरिफ लागणार होता. त्यातच आता अमेरिकेने काही सवलत देण्याचा निर्णय घेतला. मुळात म्हणजे इराण आणि अमेरिका युद्धामुळे मोठे संकट उभे आहे. होर्मुज खाडी अजूनही सुरक्षित झाली नाही. होर्मुजमध्ये मोठे हल्ले केले जात आहेत. त्यातच साैदी अरेबियावरही हुतींकडून मोठे हल्ले केले जात आहेत. विमानतळांना टार्गेट करून ही हल्ले केली जात आहेत. स्थिती गंभीर आहे.