Video: कुवेतमध्ये अडकला मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुलगा; रडत रडत मुख्यमंत्र्यांकडे केली विनंती

Video: मराठमोळी अभिनेत्री विशाखा सुभेदारचा मुलगा गेल्या चार दिवसांपासून कुवेतमध्ये अडकला आहे. तिने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्याकडे त्याला मायदेशी परत आणण्याची मागणी केली आहे.

Video: कुवेतमध्ये अडकला मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुलगा; रडत रडत मुख्यमंत्र्यांकडे केली विनंती
Vishakha Subhedar
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 03, 2026 | 1:50 PM

गेल्या तीन- चार दिवसांपासून इराणचे इस्त्रायल आणि अमेरिकेविरोधात युद्ध सुरु आहे. सर्वात आधी इस्त्रायलने अमेरिकेच्या मदतीने इराणवर 30 हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये इराणचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी इराणने अनेक आखाती देशांमधील अमेरिकेची लष्करी तळे उद्ध्वस्त करण्यासाठी हल्ले केले. यामध्ये कुवेत, दुबई, इराक, अबुधाबी अशा अनेक देशांचा समावेश आहे. या सर्व परिस्थितीमुळे अनेक देशांनी त्यांची विमानतळे बंद केली आहेत. त्यामुळे अनेक भारतीय हे दुसऱ्या देशांमध्ये अडकले आहेत. मराठमोळी अभिनेत्री विशाखा सुबेदारचा मुलगा देखील अडकला आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्याकडे त्याला मायदेशी परत आणण्याची मागणी केली आहे.

अभिनेत्रीचा मुलगा कुवेतमध्ये

विशाखा सुभेदारचा मुलगा अभिनय सुभेदार हा लंडनला जात होता. पण त्याची फ्लाइट कुवेत येथून कनेक्टिंग असल्यामुळे तेथे थांबवण्यात आली होती. मात्र, इराण आणि अमेरिका, इस्त्रायल यांच्यामध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे जगभरातील वातावरण तापले आहे. त्यामुळे कुवेत येथून अभिनयला पुढे जाता आले नाही. गेल्या चार दिवसांपासून तो कुवेतमध्ये अडकला असल्याची माहिती विशाखा सुभेदारने दिली आहे.

सरकारकडे अभिनेत्रीची विनंती

विशाखाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर रडत रडत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती, माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे माझा मुलगा लंडनच्या प्रवासाला निघाला होता. पण कुवेतमध्ये त्याचे लेओव्हर असल्यामुळे फ्लाइट तेथे उतरवण्यात आले. पण गेली चार दिवस एअरस्पोस नसल्यामुळे, सगळ्या देशाला माहिती आहे विमान रद्द केले. आणि माझा मुलगा गेली चार दिवस कुवेतमध्ये अडकला आहे असे म्हणत आहे.

पुढे ती म्हणाली, आता तिथली परिस्थिती गंभीर होत चालली आहे. आपण बातम्यांमध्ये पाहातोय. तो स्वत: तिथे अनुभवतोय. अनेक ड्रोण हल्ले तेथे होत आहेत. आता त्याला एका हॉटेलमध्ये एअरलाइन्स सर्विसेनचे त्याची व्यवस्था केली आहे. इंडियन एम्बसीने कुवेतमध्ये व्यवस्था केली आहे. परंतू आता त्यांना भारतात परत आणण्याची व्यवस्था करावी. जसं दुबईच्या लोकांना परत आणले गेले. तसेच कुवेतमध्ये सुद्धा आपले भारतीय अडकले गेले आहेत त्यांना परत आणण्याची व्यवस्था करावी अशी माझी विनंती आहे. अनेक भारतीय पोरांच्या आया, अनेक कुटुंब, त्यांची मायदेशी वाट बघत आहे. त्यांना लवकरात लवकर आणण्याची व्यवस्था करावी, आमच्या मुलांची काळजी घ्यावी एवढीच विनंती आहे.

Follow Us