सर्वात मोठ्या Burj Khalifa पेक्षाही मुकेश अंबानींच्या Antilia ची किंमत जास्त, पाहून तुमची झोप उडेल

जगातील दोन मोठ्या इमारतींपेक्षा महागडी आहे मुकेश अंबानी याचे घर. Burj Khalifa पेक्षाही जास्त आहे किंमत. आकडा ऐकून तुम्हाला बसेल धक्का.

| Updated on: Mar 01, 2026 | 1:27 PM
1 / 5
जगभरात उंचच उंच गगनचुंबी इमारतींची शर्यत सुरू असली तरी खर्चाच्या बाबतीत एक खास गोष्ट समोर आली आहे. जगातील सर्वात उंच इमारत Burj Khalifa आणि दुसऱ्या क्रमांकावरील Merdeka 118 यांना उभारण्यासाठी झालेला खर्च हा उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील आलिशान निवासस्थान Antilia पेक्षा कमी आहे.

2 / 5

संयुक्त अरब अमिरातीतील दुबई येथे उभी असलेली बुर्ज खलिफा ही 828 मीटर उंच असून जगातील सर्वात उंच इमारत मानली जाते. या प्रकल्पाचे बांधकाम 2004 मध्ये सुरू झाले आणि 2009 मध्ये पूर्ण झाले. या भव्य इमारतीला बांधकामासाठी सुमारे अंदाजे 13608 कोटी रुपये खर्च आला होता.

3 / 5

मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे उभी असलेली मर्डेका 118 ही 679 मीटर उंच आहे आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात उंच इमारत आहे. या इमारतीचे बांधकाम 2014 मध्ये सुरू झाले. या प्रकल्पासाठी सुमारे 11601 कोटी रुपये खर्च करण्यात आला.

4 / 5

मुंबईतील अँटिलिया ही 173 मीटर उंच आणि 27 मजली खासगी निवासस्थान आहे. तिचे बांधकाम 2006 मध्ये सुरू झाले आणि 2010 मध्ये पूर्ण झाले. या आलिशान घरासाठी सुमारे 18145 कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगितले जाते.

5 / 5

विशेष म्हणजे, अँटिलियाची उंची बुर्ज खलिफा आणि मर्डेका 118 पेक्षा खूपच कमी असली तरी खर्चाच्या बाबतीत ती दोन्ही इमारतींपेक्षा महाग ठरते. सुमारे 4 लाख चौरस फूट क्षेत्रफळावर पसरलेल्या अँटिलियामध्ये अनेक आलिशान सुविधा आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us