पाकिस्तानचा कतार-तुर्की-इंडोनेशियासंगे ‘बद्र’ संरक्षण करार, भारताचे ब्रह्मोस संकटात ?
आपला शेजारील उपद्रवी राष्ट्र असलेल्या पाकिस्तानने नवीन कुरापत केली आहे. पाकिस्तान आता सौदी अरबशी संरक्षणाचा करार केल्यानंतर नवा डाव खेळला आहे.

पाकिस्तानने तुर्किये, कतार आणि इंडोनेशियाशी संरक्षण करार करण्यासाठी ‘बद्र’ सामंजस्य करारावर सह्या केल्या आहेत. दोहा येथे झालेल्या या करारानुसार हे चारही देश संरक्षण उत्पादने, तंत्रज्ञान अदानप्रदान आणि सैन्य प्रशिक्षण आणि संशोधनला प्रोत्साहन देणार आहेत. सध्या या करारास सौदी अरबप्रमाणे एकावर हल्ला झाला तर स्वत:वर हल्ला मानून युद्धात उतरण्याचा करार मानला जात नाहीए हे त्यातल्या त्यात दिलासादायक असले तरी एका गोष्टीने भारताला टेन्शन आले आहे. ती गोष्ट म्हणजे इंडोनेशियाचा या करारातील सहभाग….कारण काय वाचा…
बद्र करारानुसार पाकिस्तान, तुर्कीये, कतार आणि इंडोनेशिया हे देश आपले संरक्षण उत्पादन क्षमता आणि सैन्य तंत्रज्ञान मजबूत करण्यासाठी एकत्र मिळून काम करणार आहेत. तुर्कीयेकडे विकसित संरक्षण उद्योग आणि शस्रास्र निर्मितीचे तंत्रज्ञान आहे. पाकिस्तान आणि इंडोनेशिया आपल्या मॅन्युफॅक्चरिंग क्षमता आणि श्रमबळाचे योगदान देऊ शकतात.तर कतार गुंतवणूक आणि बाजाराची मागणी द्वारे भूमिका निभावू शकतो असे म्हटले जात आहे. या करारा
या कराराने चारही देशांची संरक्षण पुरवठा साखळी जोडणे आणि एकमेकांच्या क्षमतांचा वापर करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. मात्र, या कराराची संपूर्ण माहिती सार्वजनिक केलेली नाही. या कराराचे नाव ‘बद्र’ ठेवण्याचा अचूक कारण देखील स्पष्ट झालेले नाही. अरबी भाषेत याचा अर्थ पौर्णिमेचा चंद्र असे आहे. काही तज्ज्ञांच्या मते यास इसवी सन ६२४ मध्ये झालेल्या जंग-ए-बद्र याच्याशी देखील याचा संबंध जोडत आहेत. त्याला इस्लामच्या इतिहासात महत्वाचे मानले जाते.
बद्र करार पाकिस्तान, तुर्किये आणि सौदी अरब दरम्यान झालेल्या मक्का संरक्षण कराराहून वेगळा आहे. मक्का कराराचा जोर सामुहिक संरक्षणावर आहे. यानुसार एका सदस्यावर हल्ला हा अन्य सदस्यांवर हल्ला मानला जाणार आहे. या उलट बद्र कराराचा फोकस संरक्षण उद्योग आणि सैन्य क्षमता विकसित करण्याचा आहे.
सगळ्यात मोठा धोका ?
सगळ्यात मोठा भारताला वाटणारा धोका म्हणजे भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पाकिस्तानच्या लष्करी तळांची राखरांगोळी करण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल संदर्भातील आहे. याच वर्षी भारताने जुलै महिन्यात इंडोनेशियाबरोबर ५,९५३ कोटी रुपयांचे दोन संरक्षण करार केले आहेत. त्यात ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल आणि अस्त्र या एअर-टू-एअर मिसाईलचा समावेश आहे. ब्रह्मोसचे तंत्रज्ञान जर इंडोनेशियाने पाकिस्तानला पुरवले तर भारताला धोका असल्याचे म्हटले जात आहे.
मात्र, संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी तंत्रज्ञान चोरीची शक्यता कमी असल्याचे म्हटले आहे. हा करार लष्करी युतीपेक्षा काम आणि उत्पादन वाटून घेण्याची व्यवस्था असल्याचे दिसते असे निवृत्त ग्रुप कॅप्टन अजय अहलावत यांनी म्हटले आहे.इंडोनेशियासोबतच्या करारामध्ये डेटा सुरक्षा आणि बौद्धिक संपदेबाबत कठोर तरतुदी असल्याकडे ब्रह्मोस एरोस्पेसचे माजी प्रमुख सुधीर कुमार मिश्रा यांनी म्हटले आहे.