देवा अजून काय-काय बघाव लागेल! 70 वर्षीय व्यक्तीने 22 वर्षांच्या मुलीसोबत केलं लग्न, कारण ऐकून…

'वय फक्त एक आकडा' आहे हे आता खरे झाल्याचं दिसून येत आहे. कारण सोशल मीडियावर व्हायरल होणार्‍या या व्हिडीओने सर्वच खळबळ उडाली आहे.

देवा अजून काय-काय बघाव लागेल! 70 वर्षीय व्यक्तीने 22 वर्षांच्या मुलीसोबत केलं लग्न, कारण ऐकून...
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 01, 2026 | 9:55 AM

Viral Video : सध्या सर्व तरुणांना पडलेला एकच प्रश्न पडला आहे तो म्हणजे लग्नासाठी मुलगी शोधणं. पण सध्या बघायचं झाल तर मुलगी मिळणं खूपच कठीण झालं आहे. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओने तरुणांना काही दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण व्हिडीओ पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल.

पाकिस्तानातील रावलपिंडी शहरात नुकत्याच पार पडलेल्या एका लग्नाने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगवली आहे. 70 वर्षांचे हकीम बाबर यांनी 22 वर्षांच्या तरुणीशी निकाह केल्याची बातमी समोर आल्यानंतर वधू-वरांमधील तब्बल 48 वर्षांच्या वयाच्या फरकामुळे या विवाहाची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.

ब्रायडल फोटोशूटमुळे वाढली उत्सुकता

निकाहनंतर या जोडप्याने खास प्रोफेशनल ब्रायडल फोटोशूट केले. त्यातील फोटो आणि व्हिडिओंमध्ये दोघेही वेगळ्या अंदाजात पोझ देताना दिसतात. एका व्हिडिओ क्लिपमध्ये वधू Ek Tha Tiger या चित्रपटातील लोकप्रिय गाणे Dil Diyan Gallan गुणगुणताना दिसतो आहे तर मौलाना साहेबही तिच्यासोबत सूर जुळवताना पाहायला मिळत आहेत. हाच व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ X (पूर्वी ट्विटर) वर व्हायरल होताच कमेंट सेक्शनमध्ये विविध प्रतिक्रिया आल्या आहेत. काहींनी याला लव्ह मॅरेज असे म्हटले तर काहींनी इतक्या मोठ्या वयाच्या अंतरावर प्रश्न उपस्थित केले. अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या तर काहींनी या विवाहाकडे वैयक्तिक निर्णय म्हणून पाहण्याची भूमिका घेतली.

वय फक्त एक आकडा – हकीम बाबर

पाकिस्तानी माध्यमांच्या अहवालानुसार, हकीम बाबर यांनी हा निकाह दोघांच्या संमतीने झाल्याचे स्पष्ट केले. वय फक्त एक आकडा आहे. मन तरुण असेल तर नातं मजबूत राहतं असे त्यांनी सांगितले. त्यांनी एका घटस्फोटित महिलेबरोबर निकाह केल्याचेही सांगितले. हा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे. वधूनेदेखील माध्यमांशी बोलताना खरं प्रेम वय पाहत नाही अशी प्रतिक्रिया दिली.

ही घटना समाजात वय, निकाह आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांबाबत नव्याने चर्चा सुरू करणारी ठरली आहे. प्रत्येक नातं हे परस्पर समज आणि संमतीवर आधारलेले असते. सोशल मीडियावर मतभेद असू शकतात पण हे लग्न आता इंटरनेटवरील चर्चेचा भाग बनले आहे.

Follow Us