शिक्षिकेचा जडला विद्यार्थ्यावर जीव, स्नॅपचॅटवरुन पाठवला असा मॅसेज की शिक्षिकेने ठेवले शरीर संबंध, त्या मॅसेजची सर्वत्र चर्चा
स्नॅपचॅट संदेशावरुन फिजिकल एज्युकेशन शिक्षिका आणि विद्यार्थ्यात आकर्षण निर्माण झाले आणि त्यानंतर दोघात मैत्री झाली आणि अखेर टेलिव्हिजनवर विम्बल्डन टेनिसची मॅच पाहाताना दोघांत शारीरिक संबंध तयार झाल्याचे म्हटले जात आहे.

एका १६ वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत फिजिकल एज्युकेशन शिक्षिकेनेच शारीरिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणात फिजिकल शिक्षिकेने या विद्यार्थ्यांला मोबाईलवरुन संदेश पाठवणे सुरु केले होते. त्यानंतर त्याचे रुपांतर हळूहळू लैंगिक शोषणात रुपांतर झाल्याचा आरोप सरकारी पक्षाने कोर्टात केला आहे. या प्रकरणात अल्पवयीन विद्यार्थ्यांची लैंगिक छळवणूक केल्याचा आरोप ३० वर्षीय ब्रॉनवेन जेम्स या शिक्षिकेने नाकारला आहेत.
इंग्लंडमधील साऊथहॅम्प्टन येथील बिटरने पार्क स्कूलमध्ये शारीरिक शिक्षण शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या ३० वर्षीय ब्रॉनवेन जेम्स यांच्यावर एका १६ वर्षीय विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप ठेवण्यात आला. किशोरवयीन मुलाला ही शिक्षिका दोघे एकांतात असताना ‘मिस’ म्हणायला सांगायची असे सरकारी वकीलांनी कोर्टात सांगितले आहे. इंग्लंडमधील साऊथहॅम्प्टन येथील बिटरने पार्क स्कूलमध्ये शारीरिक शिक्षण शिक्षिका म्हणून काम करत असताना त्या किशोरवयीन मुलासोबत लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप या ३० वर्षीय ब्रॉनवेन जेम्स शिक्षिकेवर आहे.तिने हे कोर्टात हे आरोप नाकारले आहेत.
physical education teacher
सरकारी वकील एडवर्ड कल्वर यांनी विंचेस्टर क्राऊन कोर्टात युक्तीवादात सांगितले की जेम्स हिने सुरुवातीला त्या विद्यार्थ्याने तिला स्नॅपचॅटवर ॲड करण्याचे केलेले प्रयत्न नाकारले होते. परंतु नंतर तिने त्याची विनंती स्वीकारली. त्या दोघांनी कथितरित्या एकमेकांना संदेशांची देवाणघेवाण सुरू केली,त्यातून त्यांच्यात एकमेकांबद्दल आकर्षण निर्माण झाले आणि दोघे वेस्टन शोरला गेले. तेथे त्यांनी गाडीत चुंबन घेतल्याचे सरकारी वकीलांनी कोर्टात सांगितले.
एकदा, जेव्हा टेलिव्हिजनवर विम्बल्डन टेनिसची मॅच दाखविली जात होती, तेव्हा त्या दोघांनी कथितरित्या “लैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी एकमेकांचे चुंबन केले आणि एकमेकांना स्पर्श केला.” सरकारी वकीलांनी असाही आरोप केला की जेम्स यांनी त्या किशोरवयीन मुलासोबत लैंगिक संबंध निर्माण केले होते, आणि तिने त्याला सांगितले होते की ती त्याच्यावर प्रेम करते आणि आपण दोघे एकत्र दूर जाऊ अशी तिने त्याच्याकडे इच्छा व्यक्त केली होती.
जेम्स हीने हे आरोप नाकारले
या पीडित विद्यार्थ्याने न्यायालयात सांगितले की, सुरुवातीला त्याला वाटले होते की हे संबंध चांगले आहेत, परंतु नंतर त्याला वाटू लागले की आपल्याला जाळ्यात ओढले जात होते.जेम्स या बिटरने पार्क स्कूलमध्ये शिकवत असताना हा प्रकार घडला. बीबीसीच्या वृत्तानुसार, त्या अल्पवयीन मुलासोबतच्या लैंगिक कृत्यांशी संबंधित चार आरोपांचा तिला या शिक्षिकेला सामना करावा लागत आहे. जेम्स हीने हे आरोप नाकारले असून न्यायालयाला एक निवेदन दिले आहे. बुधवारी ज्युरीला कार्यमुक्त केल्यानंतर खटल्याची सुनावणी थांबवण्यात आली. हे प्रकरण गुरुवारपर्यंत तहकूब केले असून नवीन ज्युरी शपथ घेतल्यानंतर त्यावर सुनावणी सुरु आहे.