बापरे! 9 महिन्याची गर्भवती महिला 5 मिनिटांत 1.6 किमी धावली, VIDEO पाहून हादराल

| Updated on: Oct 20, 2020 | 7:54 AM

एका गर्भवती महिलेने 9 व्या महिन्यात चक्क धावण्याची स्पर्धा लावली आहे. तिचा धावतानाचा व्हिडिओ पाहून नेटकरी तर थक्कच झाले.

बापरे! 9 महिन्याची गर्भवती महिला 5 मिनिटांत 1.6 किमी धावली, VIDEO पाहून हादराल
Follow us on

सोशल मीडियावर सध्या काय व्हायरल होईल याचा नेम नसतो. फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि युट्यूब अशा प्लॅटफॉर्म रोज म्हटलं तरी काही खास बाब असते. आताही असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जो पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. एका गर्भवती महिलेने 9 व्या महिन्यात चक्क धावण्याची स्पर्धा लावली आहे. तिचा धावतानाचा व्हिडिओ पाहून नेटकरी तर थक्कच झाले. (pregnant women running video goes viral on social media)

Michael Myler ने एक युट्यूबवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याची पत्नी मॅकेना धावताना दिसत आहे. खरंतर, त्याने पत्नीसोबत धावण्याची स्पर्धा लावली होती. मिशेलने दिलेल्या माहितीनुसार, मॅकेना ही नऊ महिन्यांची गर्भवती आहे. पण तरीदेखील तिने धावण्याची स्पर्धा जिंकली आहे. मिशेलला वाटलं की, 8 मिनिटांमध्ये त्याची पत्नी एक मैलाची शर्यत पूर्ण करेल पण तिने अवघ्या 5.25 सेकंदात ही शर्यत पूर्ण केली.

सगळ्यात खास म्हणजे दोघांनीही 100 डॉलर्सची पैज लावली होती. पण मिशेल यामध्ये हारला. पण पत्नी जिंकल्याचा आनंद जास्त असल्याचं त्यानं व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. खरंतर 9 व्या महिन्यामध्ये अशा प्रकारे धावताना पाहिल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला. त्यामुळे काही नेटकऱ्यांनी मॅकेनाला आयर्न लेडी म्हटलं आहे.

या जोडप्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून मॅकेनाला पाहून नेटकऱ्यांनी तिच्या आरोग्याचं कौतूक करत दोघांनाही भविष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

इतर बातम्या-

चोरी करून पोलीस स्टेशनबाहेरच गाणी ऐकत होता चोर, पोलिसांनी फिल्मी स्टाईलने घेतलं ताब्यात
पुढचे 24 तास राज्यासाठी धोक्याचे, हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

(pregnant women running video goes viral on social media)