मोठी बातमी! रशिया, युक्रेनमध्ये युद्धविराम, पुतीन यांची तडकाफडकी मोठी घोषणा, अमेरिकेचे..

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या चार वर्षांपासून युद्ध सुरूच आहे. रशियाकडून युक्रेनवर भीषण हल्ले करण्यात आले आहेत, मात्र आता रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी तडकाफडकी मोठी घोषणा केली आहे.

मोठी बातमी! रशिया, युक्रेनमध्ये युद्धविराम, पुतीन यांची तडकाफडकी मोठी घोषणा, अमेरिकेचे..
Vladimir Putin
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 05, 2026 | 8:40 PM

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या चार वर्षांपासून युद्ध सुरूच आहे. रशियाकडून युक्रेनवर भीषण हल्ले करण्यात आले आहेत, या हल्ल्यांमध्ये युक्रेनचं प्रचंड नुकसान झालं आहे, सर्व प्रकारच्या पायाभूत सविधा उद्ध्वस्त झाल्या आहेत. तर दुसरीकडे युक्रेनकडून देखील अनेकदा रशियावर हल्ला करण्यात आला आहे, या हल्ल्यांमध्ये रशियाचं देखील मोठं नुकसान झालं आहे. रशिया आणि युक्रेन युद्ध थांबाव यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न सुरूच आहेत. रशियाने युक्रेनसोबत सुरू असलेलं युद्ध थांबवावं यासाठी अमेरिकेकडून रशियावर कडक आर्थिक निर्बंध देखील घालण्यात आले आहेत. रशियासोबत जे देश आर्थिक संबंध ठेवतील त्यांच्यावर देखील निर्बंध घालल्याची धमकी अमेरिकेकडून देण्यात आली आहे. मात्र तरी देखील अजूनही डोनाल्ड ट्रम्प यांना रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबवण्यात यश आलेलं नाहीये.

मात्र आता एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांनी पुढील 72 तास युक्रेनवरील हल्ले थांबवण्याचे आदेश दिले आहेत. अमेरिकेचे विशेष राजदूत स्टीव विटकॉफ आणि जेरेड कुशनर हे रशिया आणि युक्रेनच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिकेचे हे दोन्ही प्रतिनिधी रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये पोहोचले आहेत. त्यांचा उद्देश हा रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांना अधिक गती देणं हा आहे. याच पार्श्वभूमीवर व्लादीमीर पुतीन यांनी युक्रेनविरोधातील हल्ले थांबवण्याचे आदेश दिले आहेत. अमेरिकेचे हे विशेष राजदूत तीन दिवस रशियाच्या दौऱ्यावर असणार आहेत, या काळात युक्रेनवर कोणताही हल्ला न करण्याचे आदेश रशियाकडून देण्यात आले आहेत.

सध्या अमेरिकेचे प्रतिनिधी रशिया आणि युक्रेनच्या दौऱ्यावर आहेत. या काळात आम्ही हल्ले करणार नाही, असं युक्रेनने आधीच जाहीर केलं होतं. तसेच त्यांनी रशियाला देखील या काळात हल्ले न करण्याचं आवाहन केलं होतं. रशियाने देखील युक्रेनच्या या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. आम्ही पुढील तीन दिवस कोणताही हल्ला करणार नाही, असं रशियाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे, त्यामुळे आता पुढील तीन दिवस रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध थांबणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us