स्मित मच्छार आणि ओमानच्या पायलटमध्ये झटापट सुरु, विमान थेट 17 हजार फुटांवर, प्लंबर शिकरा कॉकपिटमध्ये थेट..
फ्लायदुबईमध्ये धक्कादायक घटना घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली. कोणीही विचार करणार नाही, असे त्या विमानात घडले. खरा हिरो म्हणून भारताचा पायलट स्मित मच्छार पुढे आला. त्याचे जोरदार काैतुक केले जात आहे.

अमेरिकेतल्या 9/11 हल्ल्यासारखीच घटना बुधवारी होणारच होती…पण मुंबईकर पायलट स्मित मच्छार यांनी मोठ्या हिंमतीने प्लेन क्रॅश करण्याचा डाव उधळून लावला…आणि 174 प्रवाशांचा जीव वाचवला… या घटनेला इस्रायल आणि अमेरिकेनं Terrosit Attempt…म्हणजेच दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न असं म्हटलंय.. फ्लायदुबई कंपनीचं विमान दुबईहून इस्रायलची राजधानी तेल अवीवकडे निघालं होतं. बहुतांश प्रवासी हे इस्रायली होते… कॉकपिटमध्ये 2 पायलट होते…मुंबईचे स्मित मच्छार…आणि ओमानचा को पायलट अडीच तासांनंतर को-पालयटने शस्त्र काढलं आणि पायलट स्मित मच्छार यांच्यावर वार केले. स्मित या हल्ल्यात रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाले…तरीही स्मित मच्छार यांनी को पायटलशी झटापट सुरुच ठेवली..
हल्लेखोर को पायलटने हल्ला केला तेव्हा विमान जमिनीपासून 34 हजार फुटांवर होतं… पण पायलटवर हल्ला झाल्याने आणि झटापटीत पुढच्या काही सेकंदात विमान वेगानं 17 हजार फुटांवर आलं… विमान अचानक खाली कोसळत असल्याचा भास प्रवाशांना झाला…आणि विमानात घबराट पसरली…. इकडे कॉकपिटमध्ये गंभीर स्थितीत स्मित होते आणि त्यांनी त्याच स्थितीमध्ये कॉकपिटचे दार उघडले.
त्यानंतर कॉकपिटमध्ये इस्रायली प्रवाशी धावत आला…या इस्रायली प्रवाशाचं नाव आहे, यनिव चायोन…यनिव हे प्लंबर आहेत… यनिव जसेही कॉकपिटमध्ये शिरले..त्यांनी दोन्ही पायलटमध्ये झटापट सुरु असल्याचं पाहिलं…आणि हल्लेखोर ओमानच्या पायलटला मागून पकडत, मागे खेचलं…. तोपर्यंत इतरही प्रवासी कॉकपिटमध्ये आले…आणि हल्लेखोराला पकडलं…
त्याचवेळी यनिव चायोन चक्क पायलट सीटवर बसले…आणि विमान वर करण्याची ही स्टिक..ज्याला टेक्निकल भाषेत Aircraft Yoke म्हणतात…ही स्टीक स्वत:कडे खेचली…आणि खाली 17 हजार फुटांवर आलेलं विमान पुन्हा आकाशात वर गेलं…. सर्व घटना अवघ्या काही सेकंदात घडली…आता विमान वर घेण्याचं स्टिक हीच आहे हे या प्लंबरला कसं माहिती तर…त्याने Air Disasters” आणि “Mayday” सारखे टीव्ही शो मध्ये बघितलं होतं..
विमान काही सेकंदात पुन्हा वर झेपावलं…तोपर्यंत विमानात मागच्या बाजूला असलेल्या रिझर्व्ह पायलटने कॉकपिटमध्ये धाव घेतली…आणि विमानाचं सौदी अरेबियातील ताबूक विमानतळावर लँडिंग केलं… अशा पद्धतीने 174 प्रवासांचा जीव वाचला.. इस्रायलचे पंतप्रधान बेंझामिन नेतन्याहू आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी स्मित मच्छार यांना रिअल हिरो म्हणत कौतुक केलं…
फ्लाय दुबईच्या फ्लाईटला स्मिथ मच्छार यांनी सुरक्षित ठेवण्याचं काम केलं…आणि प्लेन क्रॅश करण्याचा ओमानच्या को-पायलटचा डाव हाणून पाडला…पंतप्रधान मोदींनीही स्मित मच्छार यांचा भारताला अभिमान असल्याचं म्हटलंय…स्मित मच्छार हे मूळचे गुजरातचे असून मुंबईत चेंबूरमध्ये राहतात..2022 पासून नोकरी निमित्त मच्छार यांचं वास्तव्य दुबईत आहे…सध्या चेंबूरच्या स्वास्तिक हाईट्स या सोसायटीत त्यांचे आई वडील राहतात…
स्मित गंभीर जखमी झाले असून सौदी अरेबियातून त्यांना यूएईत उपचारासाठी हलवण्यात आलंय…तर त्यांचे आई वडील यूएईकडे रवाना झालेत…पण चेंबूरमधल्या त्यांच्या शेजारच्यांनी स्मित यांचं कौतुक करत ते कसे मदतीसाठी तत्पर असतात हे सांगितलं…स्मित मच्छार यांची, एक अनुभवी कॅप्टन म्हणून ओळख आहे…हल्लेखोर को-पायलटच्या हल्ल्याचा सामना करत, त्यांनी 9/11ची पुनरावृत्ती होऊ दिली नाही.. नाही तर विमानातील 170 प्रवासांसह प्लेन क्रॅशमध्ये आणखी मोठी जीवित हानी झाली असती….त्यामुळं इस्रायल सोबतच भारतासाठीही स्मित मच्छार हे रिअल हिरो आहेत…