Explained : स्वीडनचं ग्रीपेन फायटर जेट 14 वर्षात आकाशात झेपावलं, मग भारताचं तेजस 33 वर्ष जमिनीवरच अडकून का पडलेलं?
Gripen vs Tejas : भारत आणि स्वीडन या दोन देशांमध्ये फायटर जेट निर्मितीच्या कार्यक्रमाला एकाचवर्षी सुरुवात झाली. पण स्वीडनचं ग्रीपेन प्रोजेक्ट सुरु झाल्यानंतर 14 वर्षात आकाशात झेपावलं. तेच भारताच्या तेजसला 33 वर्ष वाट पहावी लागली असं का?.

India Fighter Jet Tejas : सध्याच्या जमान्यात सगळ्याच देशांकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्र आहेत. कुठल्याही युद्धात एअर फोर्सची भूमिका निर्णायक असते. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी आपण हे पाहिलं. सध्या अनेक मोठ्या देशांकडे 4.5 जनरेशनची फायटर जेट्स आहेत. अमेरिका, चीन, रशियासह काही निवडक देशांकडे 5 व्या जनरेशनची स्टेल्थ फायटरं विमानं आहेत. कुठल्याही युद्धाची दिशा बदलण्यासाठी फायटर जेट्स आवश्यक असतात. भारताकडे आज राफेल, सुखोई MKI यांच्या रुपाने अत्याधुनिक लढाऊ विमानं आहेत. भारतासाठी सर्वात जास्त महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे ‘तेजस’. भविष्यात तेजस फायटर विमानांना भारतीय हवाई दलाचा कणा बनवायचा आहे. त्यासाठी तेजसच्या प्रोजेक्टवर वेगाने काम सुरु आहे. मूळात तेजस फायटर जेट निर्मितीचा कार्यक्रम भरपूर रखडला. ठरलेल्या कालमर्यादेपेक्षा बरीच वर्ष लेट झाला. 1980 च्या दशकात भारत आणि स्वीडन दोन्ही देशांनी मिळून एकाचवेळी त्यांच्या एअरफोर्सचं आधुनिकीकरण करण्यासाठी सिंगल इंजिन हलक्यावजनाचं फायटर विमानं बनवण्याचा कार्यक्रम सुरु केला. विजेन ताफ्याची जागा घेण्यासाठी स्टॉकहोल्मने साब JAS-39 ग्रीपेन फायटर विमान बनवण्याचा कार्यक्रम सुरु...