पाकिस्तान पेटलं, थेट अमेरिकन दूतावासावर हल्ला, 10 जणांचा मृत्यु, इराणमधील..

इराण आणि अमेरिकेत युद्ध सुरू असून परिस्थिती अत्यंत भयंकर आहे. सतत हल्ले केली जात आहेत. यादरम्यानच आता खळबळजनक माहिती पुढे येत आहे. पाकिस्तानमध्ये थेट अमेरिकन दूतावासाला टार्गेट करण्यात आले. थेट मोठा हल्ला करण्यात आलाय.

पाकिस्तान पेटलं, थेट अमेरिकन दूतावासावर हल्ला, 10 जणांचा मृत्यु, इराणमधील..
Pakistan Karachi American Embassy Attack
| Updated on: Mar 01, 2026 | 12:58 PM

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्ध पेटले आहे. अमेरिका आणि इस्त्रायलने मिळून इराणवर मोठा हल्ला केला. सतत मागील 24 तासांपेक्षाही अधिक काळापासून इराणवर हल्ले सुरू आहेत. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांना या हल्ल्यात ठार करण्यात आले. फक्त आयातुल्ला अली खामेनेई हेच नाही तर जवळपास त्यांचे संपूर्ण कुटुंब या हल्ल्यात ठार झाले. आयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर आता इराणचे सर्वोच्च नेते म्हणून मोजतबा खामेनी यांची निवड करण्यात आली. यानंतर अमेरिकेने मोठा इशारा देत थेट म्हटले आहे की, आजच इराणवर सर्वात मोठा हल्ला केला जाईल. इराण ज्याचा विचारही करत नाही, असा हल्ला आम्ही इराणवर करत आहोत. इराणने आमच्यावर हल्ला करण्याचा विचारही करू नये. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध पेटल्याचे बघायला मिळतंय. दुबईसह अनेक देशांवर हल्ले केली जात आहेत. विमानसेवा बंद आहे. दुबईसह कतारमध्ये अनेक भारतीय लोक अडकून पडली आहेत.

आयातुल्ला अली खामेनेई यांना ठार करण्यात आल्याने अनेक मुस्लीम देशांकडून निषेध करण्यात आला. पाकिस्तानमध्ये लोक अधिक आक्रमक होताना दिसत आहेत. थेट कराचीमध्ये अमेरिकेच्या दुतावासाची तोडफोड करण्यात आली. पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी दंगे भडकल्याचे बघायला मिळत आहे. लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरली असून निर्देषने करत आहेत. पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला.

कराचीमध्ये स्थिती अत्यंत वाईट आहे. दंगेखोरांकडून कराची येथील अमेरिकन दूतावासाला टार्गेट करण्यात आले. तोडफोड करत जाळपोळ करण्यात आल्याची माहिती मिळतंय. कराचीतील दंगेखोरांवर पोलिसांनी गोळीबार केला असून 8 जणांचा मृत्यु झाल्याची माहित मिळत आहे.

कराचीमधील अमेरिकन दूतावासाला मोठी आग लावली आहे. काही कर्मचारीही आतमध्ये असल्याची माहिती मिळतंय. अमेरिका आता यावर नक्की काय उत्तर देते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. अगोदरच अमेरिकेने इस्त्रायलमधील अमेरिकन नागरिकांना अलर्ट दिला होता. त्यामध्येच आता पाकिस्तानमध्ये अमेरिकत दूतावास कार्यालयाला टार्गेट करण्यात आले. पाकिस्तानमध्ये सध्या भयंकर स्थिती असल्याचे बघायला मिळतंय.

 

Follow Us