भूकंपाने तिबेट हादरले, ७.० रिश्टर स्केल तीव्रतेचे झटके
तिबेटला भूकंपाचे तीव्र झटके बसले आहेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.० इतकी होती. या भूकंपाचे केंद्र जमीनीच्या खाली १७३ किलोमीटर खाली होते.

तिबेटला भूकंपाचे तीव्र झटके बसले आहेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.० इतकी होती. या भूकंपाचे केंद्र जमीनीच्या खाली १७३ किलोमीटर खाली होते. या भूकंपाने प्रभावित भागात बचाव मोहिम सुरु करण्यात आली आहे. चीनच्या ताब्यातील तिबेटच्या भागात गुरुवारी भारतीय वेळेनुसार रात्री ८.०३ वाजता हे भूकंपाचे झटके जाणवले आहेत. भूकंपामुळे नेमकी किती हानी झाली आहे याची कोणतीही माहिती सध्या मिळालेली नाही.
चीनच्या ताब्यातील तिबेट क्षेत्रात गुरुवारी रात्री भारतीय वेळेनुसार ८.०३ वाजता भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. या भूकंपाचे केंद्र जमीनीच्या खाली १७३ किमी खोलवर असल्याचे सांगितले जात आहे.या भूकंपाने या भागात नेमकी किती हानी झाली आहे याचे काही माहिती अद्याप हाती आलेली नाही. या भागाला संवेदनशील भाग म्हटला जातो. कारण हिमालयाच्या ग्लेशियरमध्ये हालचाल झाल्याने नेपाळ येथे पुर आल्याची घटना घडली होती. हा ग्लेशियर तलाव भूकंपाने फुटल्याचे म्हटले जात होते.
याआधी ८ सप्टेंबर रोजी भारताचा शेजारील देश नेपाळ येथे भूकंप आला होता. तिबेट आणि नेपाळच्या आजबाजूचा भाग हा भूकंपाच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील म्हटला जातो. या आधी २६ ऑगस्ट रोजी नेपाळ-तिबेट सीमेवर ग्लेशियर कोसळल्याने मोठा महापूर आला होता. या संकटात नेपाळची अभूतपूर्व हानी झाली होती. या महापूरात हजारो लोकांना मृत्यू झाला होता अनेक लोक बेपत्ता झाले होते. येथे अजूनही पुनर्वसनाचे काम सुरु आहे.
साल २०२५ मध्ये आला होता ७ रिश्टर स्केलचा भूकंप
तिबेटमध्ये साल २०२५ मध्ये रिश्टर स्केल ७ तीव्रतेचा भूकंप आला होता. या भूकंपाने १०० लोकांचा मृत्यू झाला होता आणि एक हजार घरांची पडझड झाली होती. या भूकंपाचे केंद्र माऊंट एव्हरेस्ट पर्वतापासून ७५ किलोमीटर उत्तर-पूर्वमध्ये आणि नेपाळच्याजवळ होते. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्वेनुसार गेल्या शतकात या भागात किमान सहा रिश्टर स्केल तीव्रतेचे १० भूकंप आले आहेत.