भाई भारताने करून दाखवले, भारताचा मोठा विषय, थेट न्यूझीलंडसोबत..

भारताने जगाला आपली ताकद दाखवली आहे. भारताने थेट न्यूझीलंडसोबत मोठा व्यापार करार केला. ज्यातून दोन्ही देशात व्यापार संबंध अधिक चांगले होतील. भारतीय कंपन्यांना एक मोठी बाजारपेठ यामुळे मिळण्यास मदत होईल.

भाई भारताने करून दाखवले, भारताचा मोठा विषय, थेट न्यूझीलंडसोबत..
New Zealand and India
| Updated on: Oct 20, 2026 | 2:04 PM

न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील व्दिपक्षीय संबंध कायमच चांगली राहिली आहेत. त्यातच आता दोन्ही देशांनी मोठा निर्णय घेतला . न्यूझीलंड आणि भारत यांच्यात मुक्त व्यापार करार झाला. या करारामुळे दोन्ही देशातील व्यापाराला मोठी चालना मिळेल. विशेष म्हणजे भारतीय कंपन्यांना आणि निर्यातदारांना न्यूझीलंडच्या बाजारपेठेत आपल्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी मोठे व्यासपीठ मिळेल. यामुळे भारतीय विक्रेत्यांना नवीन ग्राहक मिळतील आणि मोठी बाजारपेठही. दोन्ही देशांना मोठे व्यासपीठ मिळणार आहे. या करारामुळे भारतीय व्यापाऱ्यांना मोठा फायदा होणार हे स्पष्ट आहे. कपडे, रेडीमेड, चामडे, गारमेंट्स, चप्पल हे तयार करणाऱ्या कंपन्यांना न्यूझीलंडसोबत व्यापार करण्याची मोठी संधी आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय यांच्या रिपोर्टनुसार, फार्मास्यूटिकल्स, मिशनरी, रसायन आणि शेती उत्पादक मंत्रालयाच्या म्हणण्यांनुसार.

इंजिनिअरिंग साहित्य, फार्मास्यूटिकल्स, मशनरी यांना मोठे मार्केट मिळणार आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत म्हटले की, भारत 20 अरब अमेरिकी डॉलरचे निवेश न्यूझीलंडला देत आहे. भारत न्यूझीलंड यांच्या मुक्त व्यापार करार 70 टक्के टॅरिफ उत्पादन बाजारात पोहोचले. हा भारताचा मोठा विजय म्हणावा लागेल.

Loading...

गेल्या काही दिवसांपासून भारतावर अनेक निर्बंध लादताना अमेरिका दिसत आहे. अमेरिकेच्या दबावापुढे न झुकता भारताकडून थेट अनेक देशांसोबत मुक्त व्यापार करार केली जात आहेत. भारतावर मोठा टॅरिफ हा अमेरिकेकडून लावण्यात आला होता. या टॅरिफमुळे भारतीय व्यापाऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. भारताने हे नुकसान भरून काढण्यासाठी मोठा निर्णय घेतला.

भारत फक्त न्यूझीलंडच नाही तर अनेक देशांसोबत मुक्त करार करत आहे. त्या देशांसाठीही भारतीय बाजारपेठ मोठे व्यासपीठ आहे. भारतीय कंपन्यांना देखील मोठी संधी मिळत आहे. भारतासाठी अमेरिका ही एक मोठी बाजारपेठ होती. मात्र, भारतावर अमेरिकेने अनेक निर्बंध लादली. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने ही निर्बंध भारतावर लादण्यात आलीत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us