नशेत धिंगाणा घालणाऱ्या राजघराण्याच्या सुनेचा हाय-व्होल्टेज ड्रामा, शुद्धीत आल्यावर तर मोठा तमाशा!

नशेत धिंगाणा घालणाऱ्या राजघराण्याची सून सध्या चर्चे आली आहे. नशेत असताना तिने भररस्त्यावर धिंगाणा घातला. ती एवढ्यावर थांबली नाही तर, तिने शुद्धीत आल्यानंतर आणखी मोठा तमाशा घातला... जर जाणून घ्या नेमकं झालं तरी काय?

नशेत धिंगाणा घालणाऱ्या राजघराण्याच्या सुनेचा हाय-व्होल्टेज ड्रामा, शुद्धीत आल्यावर तर मोठा तमाशा!
Mahrah Al Nahya
| Updated on: Oct 16, 2026 | 9:07 AM

राजघराण्याची सून म्हटलं की, तिच्या भोवती अनेक मर्यादा असतात. पण आता तर राजघराण्याची सून भररस्त्यात नशेत धिंगाणा घालताना दिसली. समोर आलेल्या माहितीनुसर अबू धाबी येथील शाही कुटुंबाची सून लंडनच्या रस्त्यांवर बेशुद्ध अवस्थेत आढळली. ती एकटीच नव्हती तर तिच्यासोबत एक मुलगा देखील होता, त्याच्या पायात चप्पल देखील नव्हती. राजघराण्याच्या सूनेचं नाव महराह अल नहयान असून ती 32 वर्षांची आहे. महराह हिने क्लास – ए – ड्रग्सचं सेवन केलं होतं. याच कारणामुळे ती बेशुद्ध झाली. अशात तिच्या जवळ असणाऱ्या मुलाची नागरिकांनी चिंता व्यक्त करत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन मुलाच्या बाबतीत हलगर्जीपणा केल्याबद्दल न्यायालयात हजर केलं, जो लंडनमध्ये एक कायदेशीर गुन्हा आहे. तर तिने मुलाची हेळसांड केल्याचा आरोप कोर्टात मान्य देखील केला आहे.

न्यायालयात सांगण्यात आलं की, महराहचं लग्न अबू धाबीच्या शाही कुटुंबात झाला आहे. शाही कुटुंबाकडून तिला दरमहा 8 हजार पाउंड भत्ता मिळतो. न्यायालयात सांगण्यात आलं की, ती जेव्हा शुद्धीत आली, तेव्हा कोणतीही दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी महराह म्हणाली, “तुम्ही लोक माझ्या मुलाची एवढी काळजी का करत आहात?” महराहच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं की, ती सरे येथील वोकिंग स्थित प्रायरी सेंटरमध्ये ड्रग्सचं व्यसन सोडवण्यासाठी उपचार घेत आहे.

Loading...

कोर्टाने सुनावली शिक्षा

महराहचा बचाव करणारे वकील स्टीफन वूलो केसी यांनी सांगितल्यानुसर, ‘प्रायरी सेंटर’मध्ये दाखल झाल्यापासून महराह हिने ड्रग्स घेणं सोडलं आहे. तिने आपल्या व्यसनाबद्दल पश्चात्ताप व्यक्त केला असून व्यसन सोडण्याचा पक्का निर्धार दाखवला. वकिलांनी पुढे सांगितलं की, घटनेच्या दिवशी त्यांच्या महराह हिने कोणतंही ड्रग्स घेतलं नव्हतं. गेल्या काही दिवसांत कोकेन घेतल्यामुळे ती खूप जास्त थकलेली होती, ज्यामुळे ती रस्त्यावर बेशुद्ध पडली.

प्रकरण ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्ती जॉनसन केसी यांनी महराह हिला दोन वर्षांच्या ‘कम्युनिटी ऑर्डर’ची शिक्षा सुनावली आहे, ज्यामध्ये तिने पुनर्वसन प्रक्रियेतून जावं लागेल. न्यायाधीशांनी तिला दरमहा 8 हजार पाउंड भत्ता मिळतो हे जाणून घेतल्यानंतर, तिच्यावर 5 हजार पाउंडचा दंड आकारला आणि 1 हजार पाउंड अदालती खर्च भरण्याचे आदेश दिले.

न्यायाधीशांनी सांगितल्यानुसार, नशेच्या स्थितीत तुम्ही मुलाला रस्त्यावर सोडून दिलं, जे मुलाच्या सुरक्षेबाबतचा तुमचा बेजबाबदारपणा दर्शवतं. जर अनोळखी लोकांनी काळजी घेतली नसती, तर मुलाला गंभीर दुखापत झाली असती. एखादा अनोळखी व्यक्ती त्याला घेऊन गेला असता किंवा त्याचं नुकसान केलं असता. रस्त्यावर तुम्हाला बेशुद्ध पाहून मूल खूप घाबरलं असतं. असं देखील न्यायाधीश म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us