Teacher-Student Love : शिक्षिकाच मर्यादा विसरली, विद्यार्थ्यासोबत ठेवले शरीरसंबंध, त्याला म्हणाली जेव्हा आपण दोघे एकटे असू, तेव्हा तू..

Teacher-Student Love :शिक्षकांवर समाज घडवण्याची जबाबदारी असते. पण काहीवेळा शिक्षकांनाच आपल्या जबाबदारीचा विसर पडतो. एका महिला शिक्षिकेची कृती सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. तीच विद्यार्थ्याच्या प्रेमात पडली.

Teacher-Student Love : शिक्षिकाच मर्यादा विसरली, विद्यार्थ्यासोबत ठेवले शरीरसंबंध, त्याला म्हणाली जेव्हा आपण दोघे एकटे असू, तेव्हा तू..
Miss James PE
Image Credit source: twitter
| Updated on: Sep 04, 2026 | 1:47 PM

शिक्षक एक चांगला समाज घडवण्याचं काम करतो. त्यांच्याकडून समाजाला दिशा मिळणं अपेक्षित असतं. विद्यार्थ्यांना घडवून भविष्यासाठी एक चांगला समाज उभा करण्याची शिक्षकांवर जबाबदारी असते. पण सध्याच्याकाळात शिक्षकांना आपल्या जबाबदारीचा, कर्तव्याचा विसर पडू लागला आहे. शिक्षकच आपली मर्यादा विसरु लागले आहेत. शिक्षकांनीच विद्यार्थीनीचा गैरफायदा घेतल्याच्या बातम्या आपल्या कानावर येत असतात. अपवादानेच अशा घटनांमध्ये शिक्षिकेचं नाव येतं. आता ब्रिटनमध्ये अशीच एक हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. तिथे एका PE शिक्षिकेवर विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. जेव्हा आपण दोघे एकटे असू, तेव्हा तू मला मिस बोलत जा असं सुद्धा ही शिक्षिका या विद्यार्थ्याला म्हणाल्याचा दावा वकिलाने कोर्टात केला.

ब्रॉनवेन जेम्स असं या शिक्षिकेच नाव असून तिचं वय 30 वर्ष आहे. साउथहॅम्प्टनच्या बिटरन पार्क स्कूलमध्ये फिजिकल एज्युकेशन शिक्षिका म्हणून काम करताना एका विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा तिच्यावर आरोप आहे. तिने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. न्यू यॉर्क पोस्टने हे वृत्त दिलं आहे. ब्रॉनवेन जेम्सने सुरुवातीला विद्यार्थ्याने पाठवलेली स्नॅपचॅटची रिक्वेस्ट फेटाळलेली. पण नंतर तिने ती मान्य केली. दोघांमध्ये मेसेजिंद सुरु झालं. या मेजेसिंगमध्ये एकप्रकारचे नखरेलपणा होता असं वकिल एडवर्ड कल्वर यांनी विंचेस्टर क्राऊन कोर्टाला सांगितलं.

आपण दोघे एकत्र लांब निघून जाऊ

दोघांनी एकमेंकाना मेसेजिंग करणं सुरु केलं. या मेसेजेसमध्ये एका लाडीकपणा, नखरेलपणा होता. दोघे भेटले व वेस्टॉन शोरला गेला. तिथे त्यांच्यात शरीरसंबंधांची सुरुवात झाली असं वकिलाने कोर्टाला सांगितलं. त्यानंतर त्यांच्यात शरीरसंबंध सुरु झाले. जेम्सने मुलाला शरीरसुखाच्या जाळ्यात ओढलं. त्याला सांगितलं मी तुझ्यावर प्रेम करते. आपण दोघे एकत्र लांब निघून जाऊ असं तिने सांगितल्याचा दावा वकिलाने कोर्टात केला.

सुरुवातीला त्याला हे नातं चांगलं वाटलं

विद्यार्थ्याने कोर्टाला सांगितलं की, सुरुवातीला त्याला हे नातं चांगलं वाटलं. पण नंतर आपण जाळ्यात ओढले जातोय हे त्याच्या लक्षात आलं. विद्यार्थ्यासोबत शरीरसंबंध ठेवल्याचे तिच्यावर चार आरोप आहेत. जेम्सनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.सुनावणी सुरु असताना एका ज्युरीने खटला सोडला. आता नवा ज्युरी आल्यानंतर या खटल्याची पुन्हा सुनावणी सुरु होईल.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us