जगात हाहाकार, अमेरिकेचे मोठे आदेश, थेट दूतावासामधील कर्मचाऱ्यांची..

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव पुन्हा वाढला आहे. दोन्ही देशांमधील तणाव कमी होत नाही. त्यातच आता अमेरिकेने मोठे पाऊल उचलले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत आदेश जारी केली आहेत.

जगात हाहाकार, अमेरिकेचे मोठे आदेश, थेट दूतावासामधील कर्मचाऱ्यांची..
Donald Trump and Mojtaba Khamenei
| Updated on: Oct 25, 2026 | 7:10 AM

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला. अमेरिकेनंतर इराणने मोठी धमकी दिली. इराणने दिलेली धमकी खरोखरच अमंलात आणली तर भारतासह अन्य देशांमधील इंटरनेट सेवा बंद होईल. त्यातच अमेरिका आणि इस्त्रायल काहीतरी मोठे करण्याच्या तयारीत आहे. त्यांच्याकडून मोठा हल्ला इराणवर करण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले जातंय. त्यातच होर्मुज खाडीत तब्बल सहा जहाजांवर मोठे हल्ले करण्यात आले. इस्त्रायल आणि अमेरिकेकडून मोठा हल्ला झाला तर इराणही शांत बसणार नसल्याचे स्पष्ट आहे. ज्यानंतर मोठा हाहाकार उडेल आणि याचे परिणाम कोणत्याही दोन देशांना नाही तर जगाला भोवावे लागेल. त्यातच अमेरिकेकडून अशा काही सूचना देण्यात आल्या, ज्याची भीती जगाला होती. अमेरिका काहीतरी मोठे करण्याच्या तयारीत असल्याचे यावरून स्पष्ट होते.

अमेरिकन गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या इशाऱ्यानंतर, अमेरिकेने मध्यपूर्वेतील आपल्या अनेक दूतावासांमधील कर्मचारी संख्या कमी केली. तसा त्यांच्याकडून आदेश देण्यात आला आणि दूतावासामधील कर्मचाऱ्यांची संख्या अत्यंत कमी केली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असा इशाराही दिला आहे की, जर इराणने नियमांचे पालन केले नाही तर अमेरिका पुन्हा लष्करी कारवाईचा मार्ग स्वीकारू शकते.

Loading...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाने खळबळ उडाली. काही दिवसांपूर्वीच इराणवर मोठे हल्ले झाले. इराणकडून आपल्या कारवाया तीव्र करण्यात आल्या. नॅशनल इंटेलिजन्सचे संचालकजे क्लेटन यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांना एका मेमोद्वारे इशारा दिला आहे. मध्य पूर्व आणि इतर देशांमध्ये अमेरिकन नागरिकांना संपवण्यासाठी इराणकडून कट आखले जात आहेत.

अमेरिकेकडून इराणला इशारा देण्यात आला. गुप्तचर माहितीनुसार, इराणच्या पायाभूत सुविधांवर मोठा हल्ला अमेरिका करू शकते.  या गुप्तचर अहवालात नमूद करण्यात आले की, इराणने अमेरिकन कर्मचाऱ्यांना टार्गेट करण्याचे आपले प्रयत्न वाढवले आहेत. या मेमोची एक प्रत सीआयए  संचालक जॉन रॅटक्लिफ यांच्याकडेही पाठवण्यात आली. त्यामुळे अनेक मोठे पाऊस उचलताना अमेरिका दिसत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us