प्रत्येक भारतीयाची तळ पायाची आग मस्तकाला गेल्याशिवाय राहणार नाही… अमेरिकेने केले पाकिस्तानबद्दल हैराण करणारे विधान, थेट..
मागच्या काही महिन्यात आंतरराष्ट्रीय पातळीवरील संबंध बदलले आहेत. पाकिस्तान अमेरिकेची चाटूगिरी करत आहे. भारताविरोधात षडयंत्र आखत आहे. त्यामध्येच आता अमेरिकेने पाकिस्तानबद्दल केलेले विधान अत्यंत धक्कादायक आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध गेल्या अनेक वर्षांपासून तणावात आहेत.पाकिस्तानकडून भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणली जातात. काश्मीरचा मोठा मुद्दा आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरून भारतावर दबाव आणण्याकरिता पाकिस्तान अमेरिकेसोबत मैत्री वाढवत आहे. मात्र, भारतावर अमेरिकेने मोठा टॅरिफ लावल्यानंतर दोन्ही देशातील संबंध तणावात होती. त्यानंतर अमेरिकेने हे संबंध सुधारण्याकरिता प्रयत्न केला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काैतुक करताना कायमच दिसतात. मात्र, यादरम्यानच अमेरिकेची दुटप्पी भूमिका कायम दिसते. पाकिस्तानला हाताशी धरून भारत आमचा चांगला मित्र आहे, म्हणायचे. अमेरिकेचा दुटप्पीपणा पुन्हा एकदा पुढे आला. एकीकडे भारताचे काैतुक करायचे तर दुसरीकडे थेट पाकिस्तानला जवळचा मित्र म्हणायचे. पाकिस्तानसोबतची मैत्री अमेरिकेला चांगलीच भारी पडणार आहे.
सिंगापुर येथील शांगरी ला डायलॉगमध्ये एकाच मंचावर अमेरिकेचे रक्षा मंत्री पीट हेगसेथ यांनी भारताचे काैतुक केले, त्यानंतर पाकिस्तानचेही काैतुक केले. भारताबद्दल बोलताना त्यांनी म्हटले की, भारतीय सशस्त्र दल आधुनिकीकरण करत आहे. विशेष म्हणजे हिंद महासागरात संतुलन बनून ठेवण्याकरिता मदत करत आहेत. यादरम्याच त्यांनी पाकिस्तानचेही काैतुक केल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या.
हेगसेथ यांनी म्हटले की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानचे नेतृत्व यांच्यात खरी मैत्री निर्माण झाली आहे. पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल आसिम मुनीर यांचे काैतुक केले. त्यांनी म्हटले की, पाकिस्तान दक्षिण आशियामध्ये शांतता राखण्याच्या प्रयत्नांमध्ये रचनात्मक भूमिका बजावत आहे. मात्र, हेगसेथ यांच्या बोलण्याने भारतीयांना मोठा धक्का बसला.
कारण भारतातील शांतता आणि प्रदेशातील शांतता विस्कळीत करण्याचे काम पाकिस्तान करतो. मोठ्या दहशतवादी कारवाया पाकिस्तानातील दहशतवादी करतात. मात्र, अमेरिकेला हे काहीच दिसत नाहीये. उलट पाकिस्तान प्रदेशात शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले. जो देश कित्येक वर्षांपासून दहशतवाद वाढत आहे, त्याला अमेरिकेकडून अशाप्रकारचे काैतुक केले जाते म्हणजे हे अत्यंत धक्कादायक आहे.