अमेरिकेत मोठा हाहाकार! डोनाल्ड ट्रम्प यांचा ताण वाढला, थेट, आता..

Warning For Trump : इराण आणि अमेरिका युद्धामुळे खळबळ उडावी. दोन आठवड्यांकरिता युद्धबंदीची घोषणा करण्यात आल्यानंतरही अमेरिकेने इराणच्या जहाजावर हल्ला केला. फक्त हल्ला नाही तर इराणचे जहाजही ताब्यात घेतले. आता मोठी धोक्याची घंटा वाजली आहे.

अमेरिकेत मोठा हाहाकार! डोनाल्ड ट्रम्प यांचा ताण वाढला, थेट, आता..
Donald Trump
| Updated on: Apr 20, 2026 | 12:27 PM

इराण आणि अमेरिका युद्ध पेटले आहे. होर्मुज खाडीत तणाव वाढला. अमेरिकेने मोठी नाकेबंदी केली. या नाकेबंदीमुळे इराणच्या बंदरातूनही एकही जहाज बाहेर निघू शकत नाही. त्यामध्येच इराणी जहाजावर हल्ला करत अमेरिकेने त्याला ताब्यात घेतले. इराण आणि अमेरिका युद्धामुळे होर्मुज खाडी पूर्णपणे ठप्प आहे. यादरम्यानच क्रूडच्या किमतीत मोठी वाढ झाली. ब्रेंट क्रूड जवळपास 6 टक्क्यांनी महाग झाले. यादरम्यानच डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी पुढे येत आहे. इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेत हाहाकार उडाला आहे. अमेरिकेने ज्याचा विचारही केला नाही, असा धक्का त्यांना बसत आहे. आता अमेरिकेत पेट्रोल स्वस्त होणार नाहीये. हा मोठा धक्का आहे. स्वत: अमेरिकेचे ऊर्जा सचिव क्रिस राइट यांनी अमेरिकेत पेट्रोलची किंमत पुढील वर्षापर्यंत प्रति गॅलन 3 डॉलरपेक्षा जास्त राहू शकते म्हटले.

ज्यानंतर अमेरिकेत मोठी खळबळ उडालीये. इंधन महागाईचा परिणाम सुरू राहणार असल्याचे दिसत आहे. युद्धामुळे अमेरिकेतही महागाई वाढताना दिसत आहे. यासोबतच त्यांनी इशारा देत म्हटले की, इराण युद्धामुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासमोर राजकीय आव्हानेही निर्माण झाली आहेत. क्रिस राइट यांनी म्हटले की, माझे म्हणणे आहे की, पेट्रोलच्या किमती उच्चांकावर पोहोचल्या आहेत.

पुढील वर्षापर्यंत त्या प्रति गॅलन 3 डॉलरपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापुढे हे एक मोठे आव्हान असल्याचे बोलले जात आहे. इराणसोबतच्या युद्धात आपल्याला कोणतीही झळ बसणार नाही, असा अंदाज डोनाल्ड ट्रम्प यांचा होता. पण प्रत्यक्षात सर्वकाही उलटे घडल्याचे बघायला मिळत आहे. अमेरिकेलाही युद्धाचा फटका बसत आहे.

इराण आणि अमेरिका युद्ध थांबवण्याकरिता प्रयत्न केली जात आहेत. मात्र, त्यापूर्वी होर्मुज खाडीत तणाव वाढल्याचे बघायला मिळाले. होर्मुज खाडीत वाढलेल्या तणावामुळे जागतिक बाजारात तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली. तेलाच्या किमती गगणाला पोहोचल्या आहेत. एक वेगळे भीषण संकट जगापुढे उभे आहे. युद्ध लवकर थांबवण्याची मागणी गेली जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us