भारताचे नाव घेत अमेरिकेचा मोठा इशारा, लक्षात ठेवा कोणत्याही देशाने जरी..
इराण आणि अमेरिका युद्धाचा फटका जगातील अनेक देशांना बसत आहे. त्यातच भारत इराणसोबत व्यापार करार करणार असल्याची तूफान चर्चा रंगताना दिसत आहे. अमेरिकेकडून इराणला मोठा इशारा देण्यात आला.

इराण आणि अमेरिका युद्धात पुन्हा तणाव वाढला. अमेरिकेने इराणवर हल्ला करण्यासोबतच त्यांनी इराणला आर्थिक कोंडीत पकडण्यासाठी मोठा निर्णय घेतला. जो कोणता देश इराणसोबत व्यापार करेल, त्याच्यावर कारवाई केली जाईल. त्या संबंधित देशावर निर्बंध लादले जाणार आहेत. यादरम्यानच अमेरिकेचे विदेश मंत्री मार्काे रूबियो यांनी नुकताच मोठा इशारा दिला. भारताचे नाव घेत त्यांनी थेट विधान केले. रूबियो यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, इराणसोबत कोणताही देश असो तो व्यापार करण्याचा विचार करत आहे, त्याच्यावर कारवाई केली जाईल. मार्काे रूबियो किर्गिस्तानची राजधानी बिश्लेलमधील SCO बैठक बोलत होते. यादरम्यान त्यांना नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान यांच्या भेटीवर प्रश्न विचारण्यात आला. दोन्ही देश व्यापार कराराच्या तयारीत असल्याचेही सांगितले जातंय.
कारण या बैठकीत इराणी अधिकारीही उपस्थित होते. पाकिस्तान देखील याच तयारीत आहे, तशी पाऊले उचलली जात आहेत. यावर रूबियो यांनी म्हटले की, मला वाटत नाही भारत इराणसोबत कोणताही व्यापार करार करेल. एक तर स्पष्ट आहे की, प्रत्येक देशाची एक स्वतंत्र निती आहे. जगातील अनेक देश इराणसोबत चर्चा करतात. हेच नाही तर आम्ही देखील इराणच्या काही लोकांसोबत बैठक घेतली.
त्यांच्यासोबत संपर्क साधला. मुळात म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की, जो कोणताही देश इराणसोबत व्यापार करेल, त्याच्यावर आम्ही कारवाई करणार आहोत. कोणत्याही अर्थव्यवस्थेने इराणची मदत करू नये. इराणला पैसा मिळाला नाही पाहिजे ही आमची भूमिका आहे.
इराणला आर्थिक कोंडीत पकडण्यासाठी प्रत्येक प्रयत्न अमेरिकेकडून केली जात आहेत. त्यातच इराण भारतासोबत जवळीकता साधत आहे. दोन्ही देश व्यापार करार करणार असल्याची तूफान चर्चा रंगताना दिसली. त्यातच आता अमेरिकेने एकप्रकारे अत्यंत मोठा इशारा दिला. इराण आणि अमेरिका युद्धाचा फटका जगातील अनेक देशांना बसत आहे. त्यातच आता पुन्हा कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली.