मोठा हाहाकार, जगाला ज्याची भीती तेच घडले, अमेरिकेचा इराणवर हल्ला, भारतावर थेट परिणाम..
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढला आहे. अमेरिकेने मोठा हल्ला केला. तब्बल चार कच्च्या तेलाच्या टँकर्सना पूर्णपणे नष्ट केले. तणाव वाढला आहे. आता इराण याला नक्की कसे उत्तर देते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव प्रचंड वाढला आहे. अमेरिकेने पुन्हा इराणवर हल्ले सुरू केली आहेत. ज्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने दोनदा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या साहाय्याने अमेरिकेच्या नौदलाच्या युद्धनौकेला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्यानंतर अमेरिका चांगलीच भडकली आहे. अमेरिकन सैन्याने इराणचे एक नाही तर तब्बल पाच कच्च्या तेलाचे टँकर्स नष्ट केले. आता या टँकर्सवर हल्ला करतानाचे व्हिडीओ पुढे आली आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढल्याने जग संकटात आहे. जागतिक बाजारात तणाव वाढण्याची शक्यता आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून मोठे युद्ध पेटले आहे. मध्यंतरी काही दिवस युद्ध शांत होते, आता पुन्हा पेटले आहे.
अमेरिकन लष्कराच्या माहितीनुसार, अमेरिकेच्या एका युद्धनौकेने इराणचे क्षेपणास्त्र हल्ल्याचे दोन्ही प्रयत्न हाणून पाडले. त्यानंतर त्यांनी आपली गस्त सुरू केली. सेंटकॉमने जाहीर केले की, इराणने केलेल्या अयशस्वी हल्ल्यांना प्रत्युत्तर आम्ही हे हल्ले केले. अमेरिकन लष्कराने ओमानच्या आखातात आयआरजीसीशी संबंधित चार कच्च्या तेलाच्या टँकर्सना पूर्णपणे नष्ट केले. या हल्ल्याचा भारतावरही परिणाम होणार आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती भडकल्याने थेट भारतातही पेट्रोल डिझेलच्या किमती वाढू शकतात.
एम/टी काविझ (M/T Kaviz), एम/टी चारमिनार (M/T Charminar), एम/टी होरायझन १ (M/T Horizon 1) आणि एम/टी रिस्को (M/T Riesco) या इराणी टँकर्सला अमेरिकेने पूर्णपणे नष्ट केले. अमेरिकेने हे हल्ले करण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना जहाज सोडून जाण्याच्या सूचना दिल्या होत्या. ज्यामुळे कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही. अमेरिकेने जहाजांचा इंजन रूमवर हल्ले केले.
CENTCOM forces destroyed five Iranian crude oil carriers, Sept. 8, after the Islamic Revolutionary Guard Corps (IRGC) targeted a U.S. Navy warship with ballistic missiles twice over the past two days. The U.S. warship successfully evaded the attempted Iranian attacks and… pic.twitter.com/Gi8a2tloN1
— U.S. Central Command (@CENTCOM) September 8, 2026
सेंटकॉमच्या माहितीनुसार, अमेरिकी सैन्याने यापूर्वी 5 सप्टेंबर रोजी इराणचे तीन कच्चे तेलवाहू जहाज नष्ट केले होते. अमेरिकी कमांडने सांगितले की, त्या कारवाईपूर्वी आयआरजीसीने एका अमेरिकी विमानवाहू जहाजावर आणि एका क्षेपणास्त्रवाहू जहाजावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. दोन्ही देशातील तणाव चांगलाच वाढला आहे. ज्यामुळे जागतिक बाजारात पुन्हा कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.