यालाच म्हणतात मस्ती… डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोने खळबळ, इराणसोबतच्या चर्चेदरम्यानच..
इराण आणि अमेरिका युद्धात वाटाघाटी सुरू आहे. यादरम्यानच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाची झोप उडवणारे काम केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली ज्याने जग तणावात आले.

इराण आणि अमेरिका युद्धात संघर्ष वाढताना दिसत आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात काही मुद्द्यांमध्ये वाटाघाटी सुरू आहे. लवकरच युद्धविराम होण्याचे संकेत आहेत. तीन महिन्यांपासून हे युद्ध सुरू आहे. जग या युद्धाने वैतागले आहे. युद्धविरामाचे संकेत असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून असे काम करण्यात आले, ज्याने डोक्याच्या मुंगा उठल्याशिवाय राहणार नाहीत. काढ्या करणे नक्की कशाला म्हणतात हे डोनाल्ड ट्रम्प यांनी दाखवून दिले. युद्धविरामाची चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये डोनाल्ड ट्रम्प दिसत आहेत. एआयच्या मदतीने बनवलेला फोटो डोनाल्ड ट्रम्प यांनी शेअर केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हा फोटो शेअर करत लिहिले की, तुम्ही गोंधळात पडत आहात… डोनाल्ड ट्रम्प यांची ही पोस्ट म्हणजे इराणला इशारा असल्याचे बोलले जात आहे.
इराण आणि अमेरिका यांच्यात अजून करार झाले नाहीत. हेच नाही तर अमेरिकेने अगोदरच म्हटले की, जर वाटाघाटीतून चर्चा झाली नाही तर इराणवर मोठे हल्ले करू. अमेरिकी लष्कर हल्ल्याकरिता तयार असल्याचेही अमेरिकेच्या रक्षा मंत्र्यांनी म्हटले. डोनाल्ड ट्रम्प यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये डोनाल्ड ट्रम्प सैन्याच्या कपड्यांमध्ये दिसत आहेत. त्यांनी बोटाने समोर इशारा केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या डोक्यावरून अमेरिकी फायटर प्लेन्स पुढे जाताना दिसत आहेत. दुसरीकडे खाली अमेरिकी जहाज लगी वॉरशिप्स समुद्रातून जाताना दिसत आहेत. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धविराम करार जवळपास झाला आहे आणि डोनाल्ड ट्रम्प यांचीच फक्त मंजूर बाकी असल्याचे सांगितले जाते. यावर डोनाल्ड ट्रम्प यांनीही भाष्य केले. मात्र, यादरम्यानच त्यांनी अशाप्रकारचा फोटो शेअर केल्याने खळबळ उडाली.
डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युद्धविराम कराराला कधी नक्की मंजूरी मिळत हे पाहण्यासारखे ठरणार आहे. इस्त्रायलला हा करार मान्य नसल्याचेही सांगितले जात आहे. या कराराकरिता त्यांचा विरोध आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ही पोस्ट शेअर केल्याने तणााव वाढू शकतो. शिवाय इराणही आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे बघायला मिळतंय.