
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच इराणसोबतच्या युद्धाबाबत अत्यंत मोठे विधान केले. इराणवर अमेरिका आणि इस्त्रायल मिळून हल्ला करत आहे. परिस्थिती अधिक तणावात बघायला मिळतंय. इराणच्या प्रमुख शहरांना टार्गेट केले जात आहे. युद्ध सुरू होऊन पाच ते सहा दिवस झाले नाहीत तोवरच अमेरिका आणि इस्त्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणच्या दोन सर्वाेच्च नेत्यांची हत्या करण्यात आली. त्यांना हल्ल्यात ठार करण्यात आले. इराणकडून त्यांच्या तिसऱ्या सर्वाेच्च नेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आली. आखाती देशात स्थिती अत्यंत गंभीर आहे. अनेक भारतीय लोक अडकले आहेत. दुबईसह, कतार, कुवेत अशा अनेक देशांवर हल्ले इराणकडून केले जात आहेत. इराणकडून आम्ही चर्चेसाठी तयार असल्याचेही सांगण्यात आले. मात्र, आता चर्चेचा वेळ निघून गेल्याचे अमेरिकेने म्हटले.
इराणमध्ये विनाश सुरू आहे. नुकताच सध्याच्या परिस्थितीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत मोठे विधान केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, या युद्धात आम्ही मजबूत स्थितीत आहोत. त्यांचे नेतृत्व झपाट्याने कमी होत आहे. मध्य पूर्वेत सतत बॉम्बस्फोट होत आहेत. अमेरिका आणि इस्रायली सैन्य संयुक्तपणे कारवाई करत आहे.
पुढे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, आम्ही श्रीलंकेच्या जवळ इराणी युद्धनाैका बुडवली. त्यांचा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा साठा वेगाने नष्ट केला जात आहे. जर अण्वस्त्रे वेड्या लोकांच्या हाती पडले तर ते खूप जास्त वाईट आहे. त्यांच्यावर युद्ध करणे आवश्यक होते. जे जे नेते बनत आहेत, त्यांना मारले जात आहे. मी खूप जास्त खूश आहे.
आम्ही युद्धात पुढे सरकत आहोत. हल्ल्यामुळे सध्या इराणी सैन्य कमकुवत झाले आहे. ट्रम्प यांनी युद्धोत्तर संपूर्ण योजना जाहीर केलेली नाही. अमेरिका आणि इराण युद्धाचा परिणाम पूर्ण जगावर होत आहे. इराणकडून महत्वाचा मार्ग बंद करण्यात आल्याने भारतात होणारी एलपीजी गॅसची आयात बंद झाली. जहाज दिसताच पेटवून देण्याचा इशारा इराणकडून देण्यात आला.