अमेरिका इराण युद्ध थांबणार, डोनाल्ड ट्रम्प यांचे थेट मोठे विधान, पुढील..

इराण आणि अमेरिका युद्धाला एक महिना होऊन गेला. या युद्धामुळे जग तणावात आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये युद्ध थांबवण्याची मागणी केली जात आहे. यादरम्यानच डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच पत्रकार परिषद घेत या युद्धावर मोठे विधान केले.

अमेरिका इराण युद्ध थांबणार, डोनाल्ड ट्रम्प यांचे थेट मोठे विधान, पुढील..
Donald Trump
| Updated on: Apr 02, 2026 | 7:00 AM

इराण आणि अमेरिका युद्धाला एक महिना पूर्ण झाला. 28 फेब्रुवारी 2026 रोजी इस्त्रायल आणि अमेरिकेने मिळून मोठा हल्ला इराणवर केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धासंदर्भात महत्वाची पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अमेरिकेच्या जनतेला संबोधित केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, यापूर्वी जगाने अशापद्धतीचे युद्ध कधीच बघितले नव्हते. इराणची क्षेपणास्त्राची क्षमता संपली आहे. अमेरिका कोणताही निर्णय घेण्यास सक्षम आहे. इराणमध्ये सत्ता परिवर्तन झाले. चुकीच्या कामाची शिक्षा मिळाली आहे. मुळात म्हणजे इराण अणुबॉम्ब बनू पाहू इच्छत होते. आम्ही हल्ल्यानंतर इराणची सत्ता उलथून टाकली. इराणने ज्या काही चुका केल्या, त्या चुका आम्ही सुधारल्या. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पुन्हा पुन्हा तोच दावा करण्यात आला की, जगाने अशाप्रकारचे युद्ध कधीही बघितले नव्हते. इराण अत्यंत धोकादायक अशी क्षेपणास्त्र बनवत होता.

पुढे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, इराणचे जवळपास सर्वच वरिष्ठ नेते आणि अधिकारी मारले गेले आहेत. युद्ध संपण्याच्या अगदी जवळ पोहोचले आहे. युद्ध लवकरात लवकर संपवले जाईल. इराणसोबतच्या युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या लष्कर अधिकाऱ्यांचे काैतुक केले. अमेरिकेसारखे सैन्य कोणाकडेच नाहीये.

Loading...

लवकरच इराणमधील ऑपरेशन संपणार आहे. तेल आणि गॅस उत्पादकावर अमेरिका नंबर वन आहे. आम्हाला इराणचे तेल नको असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दात म्हटले. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतच्या युद्धात अनेक देशांची मदत मागितली होती. पण एकही देश अमेरिकेच्या मदतीला आला नाही. होर्मुज खाडी इराणकडून बंद करण्यात आल्याने जगात वेगळेच संकट आहे.

इराणसोबतच्या युद्धात अमेरिका एकटी पडल्याचे बघायला मिळाले. साैदी, कुवेत आणि बहरीनला एकटे सोडणार नसल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. यावेळी मोठे भाष्य करत डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, इराणला अनुबॉम्ब बनू देणार नाही. पुढे बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, होर्मुज खाडी खुली झाली की, तेलाच्या किमती कमी होतील. आम्हाला होर्मुज खाडीची गरज नाही. 2 ते 3 आठवड्यात भीषण हल्ला करू असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us