डोनाल्ड ट्रम्प यांचा अत्यंत मोठा इशारा, लवकरच एक..

फ्रान्समध्ये परिस्थिती अत्यंत बिकड झाली. हजारो लोक रस्त्यावर उतरले. हेच नाही तर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने मोठे पाऊले उचलली. त्यातच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत मोठे विधान करत मी अगोदरच इशारा दिल्याचे म्हटले.

डोनाल्ड ट्रम्प यांचा अत्यंत मोठा इशारा, लवकरच एक..
Donald Trump
| Updated on: Oct 20, 2026 | 8:21 AM

फ्रान्समध्ये मोठी अशांतता पसरली आहे. मोठे दंगे सुरू आहेत. सरकारकडून ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. पण फ्रान्सची पूर्ण वाट लागली. फ्रान्समधील अशांततेवर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत मोठे विधान केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी या दंगलीवर संताप व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी असे म्हटले की, पॅरिस मुस्लिम शहर बनण्याच्या उंबरठ्यावर आहे. लवकरच ते एक मुस्लिम शहर बनेल. हेच नाही तर यादरम्यान त्यांनी स्थलांतराच्या मुद्द्यावरही मोठी प्रतिक्रिया दिली.  त्यांच्यामुळे लोकसंख्येच्या रचनेत वेगाने बदल झाले आहेत. त्यांनी जगातील कोणत्याही नागरिकाला येथे येऊ दिले, कोणालाही रोखले नाही, ज्याचे हे परिणाम आहेत.

फ्रान्समध्ये तब्बल 500000 हून अधिक लोकांनी रस्त्यावर उतरून निर्देशने केली. हजारो लोख जखमी झाले. पोलिस कर्मचाऱ्यांनाही दुखापत झाली. अनेक भागात जाळपोळ करण्यात आली. गर्दीला रोखणे मोठे आव्हान झाले. लोक निर्देशने करत होती. पूर्ण अस्थिरता यामुळे निर्माण झाली. त्यांच्या अनेक मागण्या होत्या. फ्रान्समधील परिस्थितीकडे जगाने लक्ष वेधले.

Loading...

त्यातच डोनाल्ड ट्रम्प यांनी या परिस्थितीवर बोलताना म्हटले की, ते माझे मित्र आहेत. मी त्यांना आतापासून नाही तर खूप अगोदरपासून ओळखतो. मी त्यांना अगोदरच सांगितले होते की तुम्ही फ्रान्सच्या बाबतीत खूप मोठी चूक करत आहात. तुम्ही जगभरातील लोकांना येऊ देत आहात. जगभरातून लोक फ्रान्समध्ये येत आहेत. जर हेच सुरू झाले तर तुम्हाला माहिती आहे की, पॅरिस लवकरच एक मुस्लिम शहर बनेल.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी यादरम्यान बोलताना म्हटले होते की, निदर्शनांदरम्यान झालेल्या हिंसाचारासाठी जबाबदार असलेल्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल. निदर्शनांमुळे देशातील अनेक शहरे बंद आहेत आणि तिथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. फ्रान्समधील परिस्थिती पुन्हा व्यवस्थित करण्यासाठी मोठे प्रयत्न केले जात आहेत. त्यातच ट्रम्प यांनी हे विधान केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us