विनाशाला सुरूवात, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठी घोषणा, जगाची धडधड वाढली, थेट उद्ध्वस्त..
US Israel Iran War Live : 28 फेब्रुवारी 2026 रोजी इराण आणि अमेरिका युद्धाला सुरूवात झाली. मात्र, युद्ध अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामध्येच भयंकर स्थितीमध्ये युद्ध पोहोचल्याचे बघायला मिळत आहे. नुकताच डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या धमकीमुळे सर्वांची झोप उडालीये.

इराण आणि अमेरिका युद्ध टोकाला पोहोचले आहे. मोठे हल्ले केले जात आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी काल अमेरिकेच्या जनतेला संबोधित केले. डोनाल्ड ट्रम्प युद्ध संपल्याची घोषणा करू शकतात, यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या या भाषणाकडे जगाच्या नजरा होत्या. मात्र, जगाचा त्याने विचार केला त्याच्या सर्वकाही उलटे घडले. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, आम्ही विजयाच्या अत्यंत जवळ आहोत. लवकरच युद्ध संपेल पण आता आम्ही इराणवर अधिक घातक हल्ले करणार आहोत. इराणवर पुढील दोन ते तीन आठवडे घातक आणि मोठी हल्ले केली जातील. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या घोषणेनंतर जागतिक बाजारात सोने आणि चांदीचे भाव घसरले आणि शेअर मार्केटनेही मान टाकली. आता अमेरिका आणि इस्त्रायलकडून खरोखरच भयंकर हल्ल्यांना सुरूवात झाली. इराणच्या सर्वात मोठ्या पुलावर हल्ला करत तो उडवून देण्यात आला. इतके मोठे हल्ले होत असतानाही इराण हार मानताना दिसत नाहीत.
उलट युद्ध थांबवण्याकरिता इराणकडून 6 महत्वाच्या अटी ठेवण्यात आल्या. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथआउट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे सांगितले की, आमचे सैन्य जगातील सर्वात महान आणि शक्तीशाली सैन्य आहे. आता इराणमध्ये जे काही उरले सुरले आहे, ते सर्वकाही नष्ट करण्यास सुरूवात झाली आहे.
पुलानंतर आता विद्युत प्रकल्पांचा नंबर आहे. नवीन राजवटीच्या नेतृत्वाला काय करायचे आहे हे माहीत आहे, असेही त्यांनी म्हटले. दुसरीकडे इराणकडून अगोदरच धमकी देण्यात आली की, जर आमच्या विद्युत प्रकल्पांवर हल्ले झाले तर आम्ही अमेरिकेसंबंधित सर्व कंपन्यांवर हल्ला करू.
जर खरोखरच अमेरिकेने इराणच्या विद्युत प्रकल्पांवर हल्ले केले तर युद्ध अधिक भडकण्याचे मोठे संकेत आहेत. मग इराण कोणालाही सोडणार नाही हे स्पष्ट आहे. होर्मुज खाडीच्या मुद्द्यातून अमेरिकेने अगोदरच हातवर केले असून होर्मुज खाडी आम्हाला लागत नसल्याचे त्यांनी म्हटले. होर्मुज खाडी खुली झाल्यानंतर आपोआप जागतिक बाजारात तेलाच्या किमती उतरतील असेही त्यांनी म्हटले आहे.