जगाला ज्याची प्रतिक्षा तो क्षण आलाच, कोणत्याही क्षणी होऊ शकते घोषणा, अमेरिकेकडून थेट मोठे संकेत..

इराण आणि अमेरिका युद्धात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. कोणत्याही क्षणी युद्धविरामाची घोषणा होऊ शकते. यादरम्यानच आता अमेरिकेकडून याबाबत मोठे संकेत देण्यात आलीत. जगाला ज्याची प्रतिक्षा ती घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.

जगाला ज्याची प्रतिक्षा तो क्षण आलाच, कोणत्याही क्षणी होऊ शकते घोषणा, अमेरिकेकडून थेट मोठे संकेत..
US and Iran war
| Updated on: May 25, 2026 | 9:07 AM

इराण आणि अमेरिका युद्धात युद्धविरामाबाबत चर्चा सुरू आहे. इराणची प्रमुख मागणी आहे की, अमेरिकेने त्यांच्या जवळील नाकेबंदी हटवावी. युद्धविराम होण्याचे संकेत असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जगाचे टेन्शन वाढवले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच सोशल मीडियावर एआयच्या मदतीने तयार केलेला एक फोटो शेअर केला. हा फोटो शेअर करत त्यांनी इराणला धमकी दिल्याचे दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी एका लढाऊ विमानाला बॉम्ब लावल्याचे एआय फोटोमध्ये दाखवले आहे. यासोबतच हा फोटो शेअर करत त्यांनी खास कॅप्शनही शेअर केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, धन्यवाद या प्रकरणाकडे लक्ष दिल्याबद्दल. आता डोनाल्ड ट्रम्प यांची ही पोस्ट तूफान चर्चेत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिल्याचे सांगितले जात आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविरामाबाबत अंतिम टप्प्यात चर्चा सुरू आहे. दोन्ही देश कराराच्या अत्यंत जवळ पोहोचले आहेत.

जवळपास सर्वच देशांनी या कराराकरिता पाठिंबा दिला. कोणत्याही क्षणी जगासाठी गुड न्यूज येऊ शकते. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी दिल्लीत असताना एक मोठे विधान केले. त्यांनी म्हटले की, कोणत्याही क्षणी चांगली बातमी येऊ शकते. म्हणजेच काय तर इराण आणि अमेरिका युद्ध थांबवण्याबाबत मोठ्या घडामोडी सुरू आहेत.

Loading...

संपूर्ण जग या घोषणेची वाट पाहत आहे. होर्मुज खाडी बंद आहे. ऊर्जेचे संकट आहे. यादरम्यानच दोन्ही देश चर्चा करत आहेत. कोणत्याही परिस्थिती इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध थांबले पाहिजे, ही आजच्या घडीला जगातील जवळपास सर्वच देशांची भूमिका आहे. कारण हे युद्ध कोणत्या दोन किंवा तीन देशांपुरते मर्यादित राहिले नाही तर जागतिक बाजारही अस्थिर झाला.

रूपयाचाही मोठी घसरण सुरू आहे. इराण आणि अमेरिका युद्ध थांबवण्याकरिता पाकिस्तान मध्यस्थी करत होता. मात्र, पाकिस्तानच्या मध्यस्थीला अजिबात यश मिळाले नाही. पाकिस्तानने उलट गेम करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानला बाजूला सारून थेट अमेरिकेने इराणसोबतच चर्चा करण्याचा निर्णय घेतला. इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेलाही मोठे नुकसान सहन करावे लागले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us