इराण वा हुती नक्की कोणाची भीती सतावतेय ? अमेरिकेने ११ अरब देशात जारी केला अलर्ट..

मध्य पूर्वेतील परिस्थिती आता आणखी चिघळत जाणार असल्याचे संकेत अमेरिकेने दिले आहेत. अमेरिकेने ११ देशातील त्यांच्या नागरिकांसाठी सिक्युरिटी अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार या संभाव्य हवाई क्षेत्रातील विमाने रद्द होणे, प्रवासात व्यत्यय होण्याचा संकेत मिळत आहेत.

इराण वा हुती नक्की कोणाची भीती सतावतेय ? अमेरिकेने ११ अरब देशात जारी केला अलर्ट..
iran us war
| Updated on: Oct 19, 2026 | 6:11 PM

मध्य पूर्वेत आता अखेर काय होणार आहे ? इराण आणि अमेरिका-इस्रायल युद्ध आता कोणते वळण घेणार आहे ? कारण अमेरिकेने ११ अरब देशातील आपल्या नागरिकांसाठी सिक्युरिटी अलर्ट जारी केला आहे. या इशाऱ्यात सौदी अरब, संयुक्त अरब अमिरात (UAE), कुवैत, जॉर्डन, बहारीन, ओमान, कतार, इराक, लेबनॉन, येमन आणि इस्रायलचा समावेश आहे. अमेरिकेने आपल्या नागरिकांना या ११ देशात सर्तक राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अमेरिका आणि इ्स्रायल आता इराणमध्ये कोणते मोठे ऑफरेशन राबवणार याकडे लक्ष लागले आहे.

हवाई हद्द बंद होणे आणि उड्डाणे रद्द होण्याची शंका

अमेरिकन दूतावासातील अधिकाऱ्यांनी प्रवाशांना थेट विमान कंपन्या आणि विमानतळांशी संपर्क साधून विमानाच्या स्थितीची माहिती घेण्याचा सल्ला दिला आहे. उड्डाणे ठरलेल्या वेळेत होतील याची कोणती खात्री प्रवास करण्याआधीच करावी असेही या अधिकाऱ्यांनी आपल्या नागरिकांना सूचित केले आहे. इराकमध्ये अमेरिकन मिशनने बगदाद, इरबिल, बसरा आणि सुलेमानिया एअरपोर्टच्या उड्डाणाची माहिती घेण्यास सांगितले आहे. लेबनॉनमध्ये अमेरिकन दुतावासाने बैरुतच्या रफीक हरीरी इंटरनॅशनल एअरपोर्टकडून माहिती घेण्यास सांगितले आहे.

Loading...

इराण आणि हूती हल्ल्याचाही उल्लेख

अमेरिकेच्या अलर्टमध्ये इराण समर्थित हुती बंडखोरांच्या सौदी अरबवरील हल्ल्याचा उल्लेखही आहे. यातील नागरी एअरपोर्ट आणि महत्वाच्या पायाभूत ढाच्यांवर देखील टार्गेट केले जाऊ शकते असे म्हटले आहे. या हल्ल्यांनी नागरिक जखमी होणे आणि प्रवासात गंभीर व्यत्यय येण्याची माहिती देखील देण्यात आली आहे. इराणसाठी अमेरिकन व्हर्च्युअल दुतावासाने पुनरुच्चार केला आहे की अमेरिकन नागरिकांनी येथील प्रवास करु नये आणि जे अमेरिकन नागरिक इराणमध्ये आहेत,त्यांनी तातडीने देश सोडावा.

अमेरिकन नागरिकांना काय दिला सल्ला ?

अमेरिकन मिशनने आपल्या नागरिकांना निदर्शने आणि मोठ्या गर्दीपासून दूर राहण्यास सांगण्यात आले आहे. पोलिसांच्या गर्दीपासूनही दूर राहाण्यास आणि स्थानिक मीडियावर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे. त्यांना स्थानिक अधिकाऱ्यांच्या निर्देशांचे पालन करणे, फोन चार्ज ठेवणे आणि अमेरिकन संस्थांच्या आसपास अधिक काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे.

नागरिकांनी काय करावे

सुरक्षाविषयक अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या ‘स्मार्ट ट्रॅव्हलर एनरोलमेंट प्रोग्राम’ (STEP) मध्ये नोंदणी करण्यास सांगितले जात आहे. येमेनसाठीच्या इशाऱ्यात म्हटले आहे की, सुरक्षेच्या धोक्यांमुळे अमेरिकन सरकार तेथील आपल्या नागरिकांना आपत्कालीन सेवा पुरवू शकत नाही. अमेरिकी दूतावासांनी हे देखील स्पष्ट केले आहे की, बगदाद, इराक आणि लेबनॉनमधील त्यांचे वाणिज्य दूतावास सामान्य नागरी सेवा पुरवत आहेत.

 

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us