PM मोदींनी ज्यांना चॉकलेट दिलं, त्या जॉर्जिया मेलोनी आहेत तरी कोण? वय किती, कुटुंबात कोण? वाचा…
Who is Giorgia Meloni : मेलोनी यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींसोबतचा फोटो शेअर करत 'रोममध्ये तुमचं स्वागत आहे, माय फ्रेंड' असे म्हटले. आज आपण जॉर्जिया मेलोनी नेमक्या कोण आहेत? याबाबत माहिती जाणून घेऊयात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 देशांच्या दौऱ्यातील शेवटच्या इटली या देशात पोहोचले आहेत. विमानतळावर दाखल होताच इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी त्यांचे स्वागत केले. मेलोनी यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींसोबतचा फोटो शेअर करत ‘रोममध्ये तुमचं स्वागत आहे, माय फ्रेंड’ असे म्हटले. ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. तसेच यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेलोनी चॉकलेट गिफ्ट दिली. त्यामुळे या दोघांची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. आज आपण जॉर्जिया मेलोनी नेमक्या कोण आहेत? त्यांची संपत्ती किती आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
कोण आहेत जॉर्जिया मेलोनी?
जॉर्जिया मेलोनी यांचा जन्म 5 जानेवारी 1977 रोजी इटलीची राजधानी रोम येथे झाला. त्यांचे बालपण गरबाटेला या कामगारवर्गीय भागात गेले. त्या फक्त एका वर्षाच्या असताना त्यांचे वडिल कुटुंब सोडून निघून गेले. त्यानंतर त्यांच्या आईने त्यांचे संगोपन केले. लहान वयातच त्यांनी अनेक अडचणींचा सामना केला आणि कुटुंबाची जबाबदारी उचलण्यास सुरुवात केली. त्यांनी काही काळ नाइट क्लबमध्ये बारटेंडर म्हणूनही काम केले होते.
इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान
खुप कमी वय असताना मेलोनी यांना राजकारणात रस निर्माण झाला. अवघ्या 15 व्या वर्षी त्यांनी इटालियन सोशल मूव्हमेंट (MSI) या उजव्या विचारसरणीच्या पक्षात प्रवेश केला. येथून त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली. 2006 मध्ये त्या वयाच्या 29 व्या वर्षी त्या खासदार बनल्या आणि माजी पंतप्रधान सिल्विओ बर्लुस्कोनी यांच्या सरकारमध्ये सर्वात तरुण युवा व्यवहार मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. 2012 मध्ये त्यांनी ब्रदर्स ऑफ इटली हा स्वतःचा पक्ष स्थापन केला. 2014 पासून त्या या पक्षाचे नेतृत्व करत आहेत. 2022 मध्ये त्यांनी ऐतिहासिक विजय मिळवत इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
Thank you for the gift pic.twitter.com/7ePxbJwPbA
— Giorgia Meloni (@GiorgiaMeloni) May 20, 2026
संपत्ती किती?
जॉर्जिया मेलोनी यांच्या संपत्तीबाबतची आकडेवारी सार्वजनिक करण्यात आलेली नाही. मात्र पंतप्रधान आणि दीर्घकाळ खासदार म्हणून त्यांना दरवर्षी सुमारे 99 हजार युरो उत्पन्न मिळत असल्याचे सांगितले जाते. भारतीय चलनात ही रक्कम अंदाजे 9.3 कोटी रुपयांच्या आसपास आहे. या व्यतिरिक्त त्यांच्या संपत्तीची माहिती उपलब्ध नाही.
वय किती? कुटुंबात कोण कोण?
49 वर्षीय जॉर्जिया मेलोनी सध्या सिंगल आहेत. त्यांनी 2023 मध्ये टीव्ही पत्रकार आंद्रेआ जियाम्ब्रुनो यांच्याशी ब्रेकअप केले. काही वादग्रस्त आणि महिलांविषयी अपमानास्पद वक्तव्यांचे व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यांनी हे नाते संपवण्याचा निर्णय घेतला. मेलोनी या सिंगल मदर असून त्या आपल्या जिनेवरा या मुलीचे संगोपन एकट्याने करत आहेत.
साधी जीवनशैली
इटलीच्या पंतप्रधान असूनही जॉर्जिया मेलोनी साधी जीवनशैली जगतात. त्या आपल्या राजकीय जबाबदाऱ्या आणि कुटुंबासाठीचा वेळ यामध्ये संतुलन राखण्याचा प्रयत्न करतात. कुटुंबव्यवस्था, पारंपरिक इटालियन संस्कृती आणि सामाजिक मूल्यांचे समर्थन करणाऱ्या नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे.