पाकिस्तानचे नेते बिलावल भुट्टो, युरोपच्या राजकुमारीशी लग्न करणार ? सोशल मीडियावर हंगामा

पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आणि बिलावलचे वडील, आसिफ अली झरदारी, सात दिवसांच्या खाजगी दौऱ्यावर ऑस्ट्रियामध्ये दाखल झाले आहेत. झरदारींच्या या खाजगी दौऱ्यावरुनही आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

पाकिस्तानचे नेते बिलावल भुट्टो, युरोपच्या राजकुमारीशी लग्न करणार ? सोशल मीडियावर हंगामा
Bilawal Bhutto and Gloria von Habsburg
| Updated on: Aug 30, 2026 | 11:05 PM

पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी आणि माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचा मुलगा बिलावल भुट्टो यांचा विवाह युरोपच्या शाही परिवारातील राजकुमारीशी विवाह होणार असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियात व्हायरल झाल्या आहेत. व्हायरल पोस्टमध्ये दावा केला जातोय की ३८ वर्षांचे पाकिस्तानी पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल ऑस्ट्रीयाचे अखेरचे सम्राट चार्ल्स प्रथमची ग्रेट ग्रँडडॉटर ग्लोरिया वॉन हॅब्सबर्गशी लग्न करु शकतात असा दावा केला जात आहे.

अशी चर्चा सुरु असतानाच बिलावल याचे पिता आणि पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी सात दिवसांच्या खाजगी दौऱ्यासाठी ऑस्ट्रीयात पोहचल्याने या चर्चेला आणखीनच चेव फुटला आहे.

Loading...

झरदारी यांच्या ऑस्ट्रिया दौऱ्याने शंका

पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने २७ ऑगस्ट रोजी म्हटले होते की झरदारी खाजगी दौऱ्यासाठी परदेशात गेले आहे. मात्र सुरुवातीला सांगितले नव्हते की ते कुठे आणि कोणत्या कामासाठी जात आहेत. त्यानंतर पाकिस्तानी मीडियाने सूत्रांच्या हवाल्याने बातमी देत दावा केला की बिलावल यांच्या विवाहाची तयारी सुरु आहे आणि झरदारी यांचा युरोप दौरा याच प्रकरणाशी जोडला जात आहे. सोशल मीडियावर पोस्टने या दाव्यांना आणखी हवा देत ग्लोरिया वॉन हॅब्सबर्ग याचे नाव बिलावल हीची होणारी पत्नी म्हणून सादर केले आहे.

सोशल मीडियावर ग्लोरिया वॉन हॅब्सबर्ग हीचे नाव बिलावल यांची होणारी पत्नी म्हणून चर्चेत आहे. सोशल मीडियात ऑस्ट्रियाचे माजी आर्चडचेस आणि चार्ल्स यांची ग्रेट ग्रँड डॉटरशी बिलावल यांचे नाव जोडले जात आहे. चार्ल्स प्रथम नोव्हेंबर १९१८ मध्ये राजेशाही संपण्याच्या आधी ऑस्ट्रीयाचे शेवटचे सम्राट होते. यामुळे बिलावल यांच्या कथित विवाहाचा शाही परीवाराशी संबंध जोडला जात आहे.

पीपीपीने दावा फेटाळला

सोशल मीडिया युजरनी या झरदारी यांच्या खाजगी दौऱ्याला या कथित विवाहाशी  संबंध जोडण्यास क्षणाचाही विलंब न करता आता लग्नाची तारीख लवकरच निश्चित होणार असे म्हटले आहे. मात्र, पीपीपी पक्षाने बिलावल यांच्या लग्नाच्या या चर्चांवर पाणी फेरले आहे. आणि बिलावल यांचा साखरपुडा आणि लग्नाच्या बातम्यांना चुकीच्या आणि कोणताही आधार नसून या बातम्या बिनबुडाच्या असल्याचे म्हटले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us