डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्या भेटीने भारताची वाढली चिंता, थेट..
भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध गेल्या काही दिवसांपासून तणावात आहेत. त्यातच भारतावर मोठा टॅरिफ लावण्याच्या तयारीत अमेरिका आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग अमेरिकेच्या दाैऱ्यावर आहेत. या दाैऱ्याकडे भारताच्या नजरा आहेत.

अमेरिका पुन्हा एकदा भारताला टार्गेट करत आहे. भारतावर 100 टक्के टॅरिफ लावण्याची तयारी अमेरिकेकडून करण्यात आली. तसा विधेयक देखील अमेरिकन संसदेत मंजूर करण्यात आला. भारतासह काही देशावर मोठा टॅरिफ लावला जाणार आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर टॅरिफ अमेरिका लावत आहे. त्यातच युक्रेन गेल्या काही दिवसांपासून भारताविरोधात भाष्य करत आहे. अमेरिकेत मंजूर झालेल्या विधेयकानंतर त्याचे स्वागत युक्रेनच्या अध्यक्षांनी केली. युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर जेलेंस्की यांनी म्हटले की, या विधेयकाला आम्ही खुले समर्थन देतो. हे पाऊल उचलणे आवश्यक होते. या विधेयकानंतर भारतावर मोठा टॅरिफ लागणार आहे. भारत या विधेयकाला विरोध करत आहे. भारताने आपली भूमिका स्पष्ट केली.
भारतासह चीनवरही टॅरिफ लागणार आहे. चीनकडूनही या टॅरिफचा विरोध केला जात आहे. त्यातच आता डोनाल्ड ट्रम्प आणि चीनी अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये द्विपक्षीय चर्चा सुरू होईल. दोन्ही महाशक्तींमध्ये दोन वर्षांनी अशी बैठक होईल. ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी काही दिवसांपूर्वीच जिनपिंग भारतात आले होते. जिनपिंग यांच्या अमेरिका दाैऱ्यापूर्वी भारत सर्तक आहे.
कारण भारत आणि चीनवर मोठा टॅरिफ लागणार आहे. अमेरिका आणि चीन यांच्यावर नक्की काय काय करार होतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे. दुर्लभ खनिज, एआय, वैश्विक मुद्द्यावर चर्चा होईल. भारताला सर्वात मोठी भीती चीन आणि अमेरिका यांच्यात G-2 बनण्याची भीती आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यात करार झाला तर भारताचा प्रभाव कमी होईल. अॅपलसारखी कंपनी भारतात अरबो डॉलरची गुंतवणूक करत आहे.
डोनाल्ड ट्रम्प काही दिवसांपूर्वीच चीनच्या दाैऱ्यावर आले होते. त्यानंतर जिनपिंग भारत दाैऱ्यावर आले. भारत आणि चीन यांच्यातील संबंध काही वर्षांचा विचार करता सुधारली आहेत. मात्र, अमेरिकेसोबत संबंध अधिक तणावात आली. भारतावर मोठे निर्बंध लादताना अमेरिका दिसत आहे. त्यातच टॅरिफचे संकट भारतावर आहे.