घरावरील टाकीत शेवाळ आणि दुर्गंधी वास येतो, या सोप्या ट्रिकने मिनिटांमध्ये टाकी होईल साफ
जर तुमच्या देखील घरावरील पाण्याच्या टाकीतून दुर्गंधी वास येत असेल किंवा टाकीत शेवाळ झालं असेल तर या घरगुती उपायाने मिनिटांमध्ये दुर्गंधी होईल दूर. जाणून घ्या सोपी ट्रीक.

घराच्या छतावर ठेवलेल्या पाण्याच्या टाकीची नियमित स्वच्छता न केल्यास त्यात धूळ, गाळ, शेवाळ आणि कचरा जमा होऊ शकतो. त्यामुळे पाण्याचा रंग बदलणे, दुर्गंधी येणे किंवा पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता असते.
अशा वेळी अनेक जण घरगुती उपायांचा आधार घेतात. मात्र, पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक उपायाची सुरक्षितता तपासणे महत्त्वाचे आहे.
काही घरगुती उपायांमध्ये कडुनिंबाची पाने, तुरटी आणि कापूर स्वच्छ कापडात बांधून पाण्याच्या टाकीत लटकवण्याचा सल्ला दिला जातो. तुरटीमुळे पाण्यातील काही तरंगणारे कण एकत्र येऊन तळाशी बसण्यास मदत होऊ शकते.
कडुनिंबाची पाने आणि कापराची वडी पाण्याच्या टाकीत अशा पद्धतीने लटकवा की ती पूर्णपणे पाण्यात जाईल. ही पुडी पाण्यात टाकल्याने पाण्यात किडे येण्यास बंद होतात आणि पाण्याचा वास देखील कमी येतो.
लक्षात ठेवा : केवळ तुरटी, कडुनिंब किंवा कापूर वापरून पाणी पूर्णपणे स्वच्छ आणि सुरक्षित होत नाही. टाकीची नियमित स्वच्छता, योग्य निर्जंतुकीकरण आणि पाण्याची गुणवत्ता तपासणे हे देखील महत्त्वाचे आहे.