Smit Machhar : स्मित मच्छारसारखं पायलट बनण्यासाठी किती हवं शिक्षण ? सॅलरी किती मिळते ? जाणून घ्या सर्वकाही…

आकाशात हजारो फूट उंचीवर मृत्यू समोर उभा होता, पण शांत डोक्याने 174 जणांचे प्राण वाचवून कॅप्टन स्मित मच्छार रातोरात हिरो ठरले ! अखेर कॉकपिटमध्ये आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी पायलटांना कोणतं ‘सीक्रेट ट्रेनिंग’ दिलं जातं ? जाणून घ्या पायलट बनण्याची संपूर्ण प्रक्रिया!

Smit Machhar : स्मित मच्छारसारखं पायलट बनण्यासाठी किती हवं शिक्षण ? सॅलरी किती मिळते ? जाणून घ्या सर्वकाही...
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Oct 02, 2026 | 5:18 PM

जेव्हा आकाशात हजारो फुटांवर असताना कॉकपिटमध्ये प्रत्यक्षात मृत्यू समोर उभा राहतो, तेव्हा कोणीही गळपटेल.. अशा स्थितीत पॅनिक होणं हे स्वाभाविक आहे. मात्र जीवन-मरणाचा प्रश्न असूनही शांतराहून 174 प्रवाशांचा जीव वाचवणं आणि त्यांना सुरक्षितपणे जमिनीवर उतरवणं.. येरागबाळ्याचं काम नाही ! हे फक्त नशीबामुळे घडत नाही, तर शिस्त, गट्स, हिंमत आणि वर्षानुवर्ष केलेल्या कठोर ट्रेनिंगमुळेच शक्य होऊ शकतं.

दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या विमानात भारतीय पायलट कॅप्टन स्मित मच्छार (Smit Machchhar) यांनी अतुलनीय शौर्य दाखवलं, प्रसंगावधान दाखवून त्याने कित्येक लोकांचा जीव वाचला आणि मोठा अन्र्थ टाळला. जगभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून पंतप्रधान नरेंद मोदी यांनीदेखील त्यांची प्रशंसा केली. स्मित यांच्या या धाडसी कामगिरीनंतर आज प्रत्येक तरुणाच्या मनात एकच प्रश्न आहे – अखेर कॅप्टन स्मितसारखे धाडसी पायलट घडतात तरी कसे? त्यांना प्रशिक्षणादरम्यान काय शिकवलं जातं आणि एव्हिएशन क्षेत्राची संपूर्ण इनसाइड स्टोरी काय आहे ? चला, सोप्या भाषेत समजून घेऊया – कॉकपिटपासून कॅप्टन होण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास!

Loading...

पायटलट बनण्याचं पहिलं पाऊल

10+2 (फिजिक्स, मॅथ्स आणि इंग्लिश): 12वीमध्ये फिजिक्स, मॅथ्स सोबतचत इंग्रजी हा विषयही अत्यंत आवश्यक आहे. ( तुम्ही जर आर्ट्स किंवा कॉमर्सचं शिक्षण घेतलं असेल, तर NIOS बोर्डाच्या ओपन स्कूलिंगच्या माध्यमातून हे विषय स्वतंत्रपणे घेऊन परीक्षा देता येतात.)

मेडिकल फिटनेस (DGCA Class 1 अँड 2) : तुमची दृष्टी, हृदयाचे आरोग्य, ऐकण्याची कार्यक्षमता, आणि ओव्हरऑल फिटनेस देखील चेक केला जाते. 40 वर्षांपेक्षा कमी असलेल्या पायलट्ससाठी DGCA ची Class 1 टेस्ट ही वर्षातून एकदा केली जाते.

तर DGCA च्या नियमांनुसार CPL मिळवण्यासाठी किमान 200 तासांचं फ्लाइंग प्रशिक्षण पूर्ण करावं लागतं. यामध्ये सोलो आणि क्रॉस-कंट्री फ्लाइंगचा समावेश असतो. यासोबतच एअर नेव्हिगेशन, एव्हिएशन मेटिऑरॉलॉजी, एअर रेग्युलेशन्स आदी विषयांच्या थिअरी परीक्षांमध्ये पास व्हावं लागतं.

कॉकपिटचं ट्रेनिंग कसं होतं ?

सामान्य माणूस ते या अवाढव्य लोखंडी पक्ष्याचा (विमान) ‘कॅप्टन’ बनणं, हा प्रवास खचितच सोपा नाही. त्यासाठी प्रचंड खडतर ट्रेनिंग सहन करावं लागतं. त्यासाठी कठोर शिस्त, सातत्यपूर्ण सराव आणि अनेक आव्हानात्मक टप्प्यांतून जावं लागतं.

याची सुरूवात होतो की ग्राउंड स्कूल थिअरी प्रशिक्षणापासून.. तिथे वैमानिकांना हवामान कसं बदलतं, त्याचा विमानाच्या उड्डाणावर काय परिणाम होतो, विमानातील गुंतागुंतीच्या तांत्रिक यंत्रणा कशा काम करतात आणि हवाई क्षेत्राचं नियम-कायदे काय आहेत, याचं सखोल ज्ञान दिलं जातं.

मग दुसऱा असतो तो इन्स्ट्रुमेंट फ्लाइंगचा टप्पा. रात्री गडद अंधार असो किंवा घनदाट धुकं, अथवा खराब हवामानामुळे बाहेरचं काहीही दिसत नसो – अशी कोणतीही परिस्थिती आली तर वैमानिकाला केवळ कॉकपिटमधील इन्स्ट्रुमेंट्स आणि स्क्रीनवर विश्वास ठेवून विमान नियंत्रित करावं लागतं आणि सुरक्षित लँडिंगही करावं लागतं. यानंतर सुरू होतं इमर्जन्सी ड्रिल्स आणि सिम्युलेटर ट्रेनिंग. हाच तो टप्पा, जिथे वैमानिकांना संकटाच्या क्षणीही शांत राहून योग्य निर्णय घेण्याची सवय लावली जाते.

सिम्युलेटरमध्ये कॉकपिटला अचानक आग लागण, इंजिन फेल होणं, विमानाची उंची वेगाने कमी होणं (Dive Survive) किंवा इतर गंभीर तांत्रिक बिघाड अशा अनेक परिस्थिती या कृत्रिमरीत्या निर्माण केल्या जातात. त्यांचा पुन्हा पुन्हा सराव करून घेतला जातो, जेणेकरून प्रत्यक्ष संकटाच्या वेळी वैमानिक गोंधळून न जाता समोर आलेली परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळू शकेल. मात्र, आणि ही प्रक्रिया इथेच संपत नाही. वैमानिकांची कौशल्यं सतत तपासली आणि अद्ययावत ठेवली जावीत, त्यासाठी दर 6 महिन्यांनी Proficiency Check, म्हणजेच सिम्युलेटर चाचणी घेतली जाते.

किती मिळतो पगार ?

भारतात सध्या एव्हिएशन सेक्टर हे सर्वात उत्तम काळात आहे. हे सेक्टर वेगाने विस्तारत असून व्या विमानांच्या मोठ्या ऑर्डर्समुळे येत्या काळात प्रशिक्षित वैमानिकांची मागणीही वाढत आहे.

या क्षेत्रातील कमाईचा अंदाज साधारणपणे पुढीलप्रमाणे :

जुनिअर फर्स्ट ऑफिसर / ट्रेनी: 50,000 ते 1,00,000 रुपये प्रती महीना (स्टायपेंड)

फर्स्ट ऑफिसर (को-पायलट):2.5 लाख ते 4.5 लाख रुपये प्रती महीना

कॅप्टन (कमांडर): 6.5 लाख ते 9.5 लाख रुपये प्रती महीना

वरिष्ठ / आंतरराष्ट्रीय कॅप्टन : 10 लाख ते 15 लाखरुपये दर महीना

वर नमूद करण्यात आलेला पगाराा जो आकडा आहे, तो विविध उपलब्ध स्रोतांवर आधारित आहे. एअरलाइन, अनुभव, विमानाचा प्रकार आणि इतर घटकांनुसार प्रत्यक्ष पगारात फरक असू शकतो.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us