कधीही या, कधीही जा… कितीही प्रवास करा… देशातील असं एक स्टेशन जिथे प्रवासी तिकीटाशिवाय करतात प्रवास; काय आहे भानगड ?

भारतातील एक स्टेशन असं आहे जिथे अनेक ट्रेन्स थांबतात, पण तिथे लोकं विनातिकीट ट्रेनचा प्रवास करतात. विशेष म्हणजे त्यांना कोणी थांबवतही नाही. असं कोणतं आहे ते स्टेशन, काय आहे नाव ?

कधीही या, कधीही जा... कितीही प्रवास करा... देशातील असं एक स्टेशन जिथे प्रवासी तिकीटाशिवाय करतात प्रवास; काय आहे भानगड ?
| Updated on: Sep 25, 2026 | 3:13 PM

देशात अशा वेगवेगळ्या जागा आहेत ज्यांची काही खासियत आहे, त्यामुळे ती प्रसिद्ध होता. पण झारखंडमध्ये एक रेल्वे स्थानक असं आहे, जिथून प्रवास करण्यासाठी रेल्वे तिकीटाची गरजच लागत नाही. वाचून आश्चर्य वाटलं ना ? पण हे खरं आहे. झारखंडमध्ये हे रेल्वे स्थानक असून तिथे तिकीट काढून देणारा कर्मचारीच नाहीये. खरंतर , हे एक ‘हॉल्ट’ स्थानक आहे. ही कथा झारखंडमधील चक्रधरपूर रेल्वे विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या महादेवसाल रेल्वे स्थानकाबद्दल (महादेवसाल हॉल्ट) आहे. दक्षिण पूर्व रेल्वेच्या या स्थानकावरून दररोज सुमारे 6 गाड्या जातात आणि तिथे थांबतातही. शेकडो प्रवासी महादेवसाल स्थानकावरून रेल्वे प्रवासासाठी गाडीत चढतात. मात्र, या स्थानकावरून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना तिकीट काढण्याची आवश्यकता पडत नाही.

तरसं पहायला गेलं तर या स्थानकावर तिकीट खिडकी तर आहे, पण तिथे नियमित बुकिंग क्लार्कची नियुक्तीच केलेली नाही. त्यामुळे प्रवाशांची इच्छा असूनही त्यांना महादेवसाल स्थानकावरून रेल्वेचं प्रवासी तिकीट खरेदी करता येत नाही. चक्रधरपूर–राउरकेला रेल्वेमार्गावर असलेलं हे महादेवसाल रेल्वे स्थानक चक्रधरपूर रेल्वे विभागीय कार्यालयापासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर आहे.

डीआरएमच्या भेटीनंतर प्रकरण चर्चेत

चक्रधरपूर रेल्वे विभागाचे डीआरएम तरुण हरिया हे 22 सप्टेंबर रोजी महादेवसाल स्थानकाच्या पाहणीसाठी पोहोचले होते. मात्र तेव्हा त्यांना अशी माहिती मिळाली की या स्टेशनवर तिकीट काउंटर तर आहे; पण बुकिंग क्लर्क नसल्यामुळे इथे तिकीट विक्रीची कोणतीही व्यवस्था नाही. सुमारे 10 वर्षांपूर्वी, 2016 साली रेल्वेने सुमारे 4 कोटी रुपये खर्च करून महादेवसाल स्थानकाची भव्य इमारत बांधली होती. या स्थानकाचं स्वरूप एखाद्या मंदिरासारखं आहे. प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या सर्व नागरी सुविधांची, संपूर्ण व्यवस्था इथे आहे. पण या स्टेशनला ‘कमर्शियल स्टॉपेज’चा दर्जा नसल्यामुळे तिकीट विक्रीसाठी तिथे आजपर्यंत एकाही बुकिंग क्लर्कची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

तरीही चक्रधरपूर रेल्वे विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या महादेवसाल रेल्वे स्थानकावर दररोज चक्रधरपूर–राउरकेला पॅसेंजर ट्रेन, टाटा–इतवारी पॅसेंजर ट्रेन, टाटा–बिलासपूर पॅसेंजर ट्रेन यांसह जवळपास अर्धा डझन गाड्यांचा इथे थांबा असतो. “महादेवसाल स्टेशन हे एक ऑपरेटिंग स्टेशन आहे, फक्त ऑपरेटिंग कार्यासाठी. हे स्टेशन कमर्शिअल स्टॉपेजसाठी नाही”, असं चक्रधरपुर रेल मंडळचे सीनिअर डीसीएम आदित्य कुमार चौधरी यांनी नमूद केलं.

तिकीट काउंटर का नाही ?

विशेष म्हणजे, श्रावण महिन्यात या रेल्वे स्थानकावर तात्पुरते तिकीट काउंटर सुरू केलं जातं. कारण या ठिकाणी भगवान शिवाचे एक जुनं मंदिर आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. त्यांच्या सोयीसाठी रेल्वेकडून त्यावेळी तात्पुरते तिकीट काउंटर सुरू करण्यात येतं . तिथे एक टाइप-सी कॅटेगरी स्टेशन आहे, पण ते कमर्शिअल स्टॉपेज नाही, म्हणूनच तिथे बुकिंग क्लर्कची व्यवस्था नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us