देशातील 5 सर्वात महागडे आंबे, टोपलीभर आंब्यांच्या किंमतीत येईल लक्झरी कार

भारतातील आंब्यांची ओळख जगात सर्वत्र आहे. भारतात वेगवेगळ्या जातीच्या आंब्याची शेती केली जात असते. मात्र, काही आंब्याच्या जातीची किंमत अक्षरश: लाखो रुपयात असते.

देशातील 5 सर्वात महागडे आंबे, टोपलीभर आंब्यांच्या किंमतीत येईल लक्झरी कार
world highest price mango
| Updated on: May 09, 2026 | 5:02 PM

Mango Varieties in India: आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते. आंब्यासारखे मधूर फळ न आवडणारा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. उन्हाळा सुरु होताच अनेकांना आंब्याचे वेध लागतात. आंबा न नाशवंत फळ असल्याने त्याला स्टोरेज करुन ठेवता येत नाही. ते ठराविक मोसमातच मिळते. भारतीय आंब्यांना परदेशात प्रचंड मागणी असते. आंब्याच्या आगमनासाठी खूप वाट पाहावी लागते. आंब्याच्या काही जाती इतक्या दुर्लभ आणि महाग आहेत. त्यांची किंमत ऐकूनच तुमच्या तोंडचे पाणी पळेल…

आंबे हे नाजूक पिक आहे त्याची मशागत आणि देखभाल काळजीपूर्वक करावी लागाते. त्यासाठी मोठी मेहनत आणि तंत्रज्ञान लागते. चला तर पाहूयात भारताच्या पाच सर्वात महाग आंबा कोणता ते पाहूयात….

भारताच्या नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाची वेबसाईट nhb.gov.in च्या नुसार जपानी Miyazaki आंबा ज्यास ‘सुर्याचे अंडे’ देखील म्हटले जाते. भारताच्या मध्य प्रदेशात याची शेती केल्याच्या बातम्या देखील चर्चेत असतात.

अल्फान्सो-हापुस (Alphonso)

या आंब्यांचा राजा म्हटले जाते. हा महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि मध्य प्रदेशात खूप पिकवला जातो. हा मध्यम आकाराचा अंडाकार तिरपा आणि नारंगी पिवळ्या रंगाचा असतो. यात रसाचे प्रमाण जास्त असते. याची साठवणूक क्षमता(keeping quality) चांगली असते. तसचे गर काढण्यासाठी हा आंबा चांगला असतो. हापूस आंब्याला अनेक देशात निर्यात केले जाते. हा आंबा चांगला सुगंध आणि केशरी रंगासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. याची किंमत 2,000 ते 5,000 रुपये प्रति किलो असते.

नूरजहां ( Noor Jahan )

हा आंबा आपल्या विशाल आकारासाठी ओळखली जाते. मध्य प्रदेशातील अलीराजपूर आढळणारा हा आंबा एक फूटापर्यंत लांब असतो. याची किंमत 500 ते 1,000 रुपये प्रति नग असते.

कोहिनूर ( Kohinur )

मुर्शिदाबाद येथील हा दुर्मिळ आंबा नवाबांची पसंद मानला जायचा. या आंब्याला ठेवणे आणि कापण्याची पद्धत खास आणि नाजूक असते. याची किंमत 1,500 ते 3,000 रुपय प्रति नग इतकी महाग आहे.

मलगोवा ( Malgova )

दक्षिण भारताचा हा शाही आंबा त्याचा मोठा आकार आणि कमी तंतू असलेल्या कोयीसाठी ओळखला जातो. याचा स्वाद खूपच मखमली असते.

मियाझाकी ( Miyazaki )

जगातील सर्वात महागडा आंबा म्हणून मियाझाकी आंबा ओळखला जातो. हा आंबा मुळचा जपानचा आहे. आता भारतातील शेतकरी देखील या आंब्याला पिकवत आहेत. प्रचंड महागडा हा आंबा जांभळा रुबी-लाल रंगाचा असतो. आता हा आंबा बिहार, प.बंगाल, ओडिशा आणि मध्य प्रदेशात उगवला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारात या आंब्याला प्रचंड महाग दरात विकले जाते. याची किंमत 2.5 लाख ते 3 लाख प्रति किलो इतकी असते.

 

Follow Us