जगातील एकमेव नदी… जी दोन-तीन नव्हे तर 11 देशांना देते जीवदान, वाळवंटी प्रदेशासाठी वरदान

The longest River in the World: भारतीय संस्कृतीत नद्यांना देवीचे स्थान देण्यात आले. गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी, कावेरी, नर्मदा, कृष्णा अशा अनेक नद्यांना मातेसमान दर्जा आहे. जगातील ही नदी एक दोन नव्हे तर 11 देशांची जीवनदायिनी आहे. कोणती आहे ही नदी? काय आहे तिचे महत्त्व?

जगातील एकमेव नदी... जी दोन-तीन नव्हे तर 11 देशांना देते जीवदान, वाळवंटी प्रदेशासाठी वरदान
जगातील सर्वात लांब नदी
| Updated on: Jul 18, 2026 | 2:35 PM

Nile River flows in 11 Countries: नदी ही जीवसृष्टीच नाही तर मानवी वसाहतीचे प्रमुख केंद्र आहे. जग आधुनिकतेच्या बाता मारत असले तरी अनेक शहरं, गावं ही नदीच्या सानिध्यातच वसवली गेली आहे. नदीशिवाय गावाची, शहरांची पूर्वी कल्पनाही केली जात नव्हती. नद्या या मानवी संस्कृतीचा चढता आलेख आहेत. नद्यांमुळे मानवाला शेती उमगली. सिंचन व्यवस्था, मासेमारी, पशू पालन यासाठी नदीचे खोरे उपयुक्त ठरले. जगात अनेक मोठ्या नद्या आहेत. भारतीय संस्कृतीत नद्यांना मातेचा दर्जा आहे. जगात एक अशी नदी आहे जी एक, दोन नव्हे तर 11 देशातून वाहते. तिच्या काठावर अनेक देशांच्या संस्कृती जोपासल्या गेल्या आहेत. या देशांमध्ये सीमेवरून वाद असला तरी या नदीने कधी या देशात भेदभाव केलेला नाही. कोणती आहे ही नदी?

नाईल नदी नव्हे वरदान

जगातील अनेक नद्या हा दूरपर्यंतचा पल्ला गाठतात आणि वाहत समुद्रात मिसळतात. पण यातील अनेक नद्या या एक अथवा दोन, चार देशातूनच जातात. पण नाईल ही नदी अनेक देशातून वाहत जाते. नाईल ही आफ्रिका खंडातील सर्वात लांब नदी मानली जाते. ही नदी 11 देशांमधून वाहत जाते. तिचे जलक्षेत्र हे 11 देशात विस्तारलेले आहे.

नाईल नदीची लांबी जवळपास 6,650 किलोमीटर इतकी आहे. दोन उपनद्यांनी मिळून नाईल नदी तयार झाली आहे. व्हाईट नाईल आणि ब्लू नाईल अशा या दोन उपनद्या आहेत. व्हिक्टोरिया सरोवरातून व्हाईट नाईल प्रदीर्घ प्रवास करत येते. तर इथियोपियाच्या ताना सरोवरातून ब्लू नाईलचा प्रवास सुरू होतो. या दोन्ही नद्या पुढे सुदानची राजधानी खार्तुम येथे एकमेकींमध्ये मिसळतात आणि नाईलचा विस्तीर्ण प्रवास सुरू होतो. ही नदी पुढे नाईल या नावाने अनेकांना जीवनदान देते.

कोणत्या देशातून वाहते नाईल?

रवांडा, बुरुंडी, टांझानिया, युगांडा, कांगो गणराज्य, केनिया, इथियोपिया, इरिटिया, दक्षिण सुदान, सुदान आणि इजिप्त या अकरा देशातून ही नदी वाहते. ती या भागातील प्राणीमात्रांसाठी वरदान आहे. आफ्रिकेतील अनेक भागांना पाणी पुरवठ्याचे काम नाईल नदीतूनच होते. नाईल ही आफ्रिकेसाठी दुसरी गंगा नदीच आहे. नाईलचा खरा फायदा हा इजिप्त या देशाला झाला आहे. या देशाला सुखसमृद्धी या नदीमुळेच आली आहे. येथील ऐतिहासिक क्षणांची ही नदी साक्षीदार आहे. पिरॅमिड्स तयार होण्यापूर्वीपासून ते आतापर्यंतच्या इजिप्तचे अनेक टप्पे या नदीवरच अवलंबून असल्याचे दिसून येते. पुढे उत्तरेकडे वाहत जात नाईल नदी इजिप्तमधून पुढे भूमध्य समुद्राला मिळते. ॲमेझॉन ही जगातील सर्वात मोठी नदी आहे. तर नाईल ही सर्वात लांब नदी आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us