या झाडाखाली थांबलात तर साक्षात यमच दिसणार! कुठे आहे मृत्यूचे झाड? पावसाळ्यात का ठरते सर्वात खतरनाक?

Tree of Death: हे झाड म्हणजे साक्षात मृत्यूचे दार मानले जाते. पावसाळ्यात तर या झाडाखाली थांबू नये असे मोठे मोठे फलकही लावले जातात. या झाडाखाली थांबले तर जीव वाचण्याची शक्यता फारच कमी मानली जाते.

या झाडाखाली थांबलात तर साक्षात यमच दिसणार! कुठे आहे मृत्यूचे झाड? पावसाळ्यात का ठरते सर्वात खतरनाक?
कुठे आहे मृत्यूचे झाड?
| Updated on: Jul 16, 2026 | 2:16 PM

Is Manchineel Tree Really Deadly: निसर्गात नेहमी काही चमत्कारी घटना घडतात. निसर्ग भरभरून देतानाच काही गोष्टीत धोके पण असतात. असेच एक झाड आहे मॅनशिनील. त्याला मृत्याचा वृक्ष असेही म्हणतात. समुद्र किनाऱ्यावर हे झाड नेहमी दिसते. हे एक साधारण झाड आहे. पण तितकेच ते धोकादायक मानले जाते. हे झाड खतरनाक असल्याबाबत फलक लावले जातात. नवीन लोकांना, पर्यटकांना त्याच्याविषयीची माहिती या फलकावर देण्यात येते. या झाडाखाली न थांबण्याचा सल्ला दिल्या जातो. विशेषतः पावसाळ्यात या झाडापासून चार हात लांब राहण्याचा सल्ला दिल्या जातो. याला मृत्यूचे झाड का म्हणतात?

मृत्यूचे झाड आहे काय?

काही झाडं अत्यंत धोकादायक मानली जातात. त्यात मॅनशिनील हे आघाडीवर आहे. हे झाड विषारी मानले जाते. त्याला ट्री ऑफ डेथ म्हटले जाते. त्याचे नाव मंजानिला हे आहे, ते स्पॅनिश भाषेतून आले आहे. त्याचा अर्थ छोटे सफरचंदाचे झाड असे आहे. या झाडाला छोट्या सफरचंदासारखी दिसरणारी फळं येतात. पण हे झाड सर्वसाधारण नाही, तर धोकादायक मानले जाते.

कुठे आढळते हे झाड?

हे झाड मुख्यतः कॅरेबियन परिसरात, फ्लोरिडा, बहामास, मध्य अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेच्या उत्तरी भागात आढळते. या झाडाची उंची जवळपास 15 ते 50 फूटपर्यंत असते. हे झाड घनदाट झाडीसारखे दिसते. या झाडाची एक धोकादायक बाब म्हणजे या झाडाचा प्रत्येक भाग साल, पानं, फळ आणि झाडातून निघणारा रस हा विषारी असतो.

पावसाळ्यात का वाढतो धोका?

या झाडाजवळ जाणे अत्यंत जोखमीचे मानले जाते. पावसाळ्यात या झाडाखाली न थांबण्याचा सल्ला दिला जातो. या झाडावर पावसाचे पाणी पडते आणि ते जर अंगावर पडले तर अंगावर फोडं येतात. त्यात मोठा दाह असतो. हे पाणी विषारी मानलं जाते. जर हे पाणी डोळ्यात, नाकातोंडात गेले तर शरीरावर मोठा परिणाम होतो. डोकेदुखी, चक्कर येणे असे प्रकार घडतात. श्वास घेण्यास त्रास होतो. जर लवकरच इलाज, उपचार मिळाला नाही तर जीवाला मोठा धोका निर्माण होतो. अंधत्व येण्याची भीती असते.

याचे फळ म्हणजे मृत्यूला आमंत्रण

या झाडाला सफरचंदासारखं दिसणारं छोटं फळ येतं. तज्ज्ञांच्या मते, त्याची चव गोड आहे. पण थोड्याच वेळात तोंडात फोड येतात. दाह निर्माण होतो. घशात जळजळ होते. पदार्थ गिळण्यास मोठा त्रास होतो. त्यानंतर फुफ्फुसावर मोठा परिणाम होतो. रक्ताची उलटी होऊ शकते. पचन क्रियेवर मोठा परिणाम होतो. हे झाड धोकादायक असले तरी समुद्र किनाऱ्यावर माती धरून ठेवण्याचे काम या त्याची मूळ करतात. समुद्रात जमीन वाहून जात नाही.

Follow Us