DMart पेक्षाही या ठिकाणी मिळते सर्वात स्वस्त सामान, ग्राहकांची खरेदीसाठी असते प्रचंड गर्दी

DMart पेक्षाही सर्वात स्वस्त सामान. 99 रुपयांपासून ते 399 रुपयांपर्यंत अनेक वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची या ठिकाणी प्रचंड गर्दी. महिलांसाठी हे ठिकाणं म्हणजे लॉटरी.

DMart पेक्षाही या ठिकाणी मिळते सर्वात स्वस्त सामान, ग्राहकांची खरेदीसाठी असते प्रचंड गर्दी
Image Credit source: Social media
| Updated on: Jul 16, 2026 | 12:58 PM

मुंबईत पावसाळ्याला सुरुवात होताच बाजारपेठांमध्ये पावसाळी वस्तूंच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होते. ज्यामध्ये रेनकोट, शूज, बॅग्स, ट्रेंडी कपडे आणि फॅशन अ‍ॅक्सेसरीज खरेदी करण्यासाठी ग्राहक मोठ्या प्रमाणावर विविध मार्केट्समध्ये गर्दी करतात.

अशा वेळी कमी किमतीत दर्जेदार आणि ट्रेंडी वस्तू मिळाव्यात, अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे अनेकजण डी-मार्ट पेक्षा चांगल्या कपड्यांसाठी ‘झुडिओ’ (Zudio) स्टोअरला पसंती देतात. सध्या हे ठिकाण ग्राहकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत असून, येथे महिलांपासून पुरुष आणि लहान मुलांपर्यंत सर्वांसाठी विविध प्रकारच्या वस्तू परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत.

झुडिओमध्ये महिलांसाठी आणि पुरुषांसाठी विविध डिझाइन, रंग आणि आकारांमध्ये पावसाळी शूज उपलब्ध आहेत. या शूजची सुरुवातीची किंमत केवळ 299 रुपये आहे. याशिवाय मुलं आणि मुलींसाठी आकर्षक चप्पलांचे अनेक पर्याय उपलब्ध असून त्यांची किंमत 149 रुपयांपासून 399 रुपयांपर्यंत आहे. पावसाळ्यात उपयोगी पडणाऱ्या स्टायलिश आणि मजबूत बॅग्सचीही येथे मोठी रेंज असून त्या 199 ते 399 रुपयांच्या दरात उपलब्ध आहेत.

कमी किमतीत ट्रेंडी कपड्यांची मोठी निवड

फॅशनप्रेमींसाठी या स्टोअरमध्ये महिलांसाठी आणि पुरुषांसाठी टी-शर्ट्सचे आकर्षक कलेक्शन उपलब्ध आहे. आधुनिक डिझाइन्स आणि विविध रंगांमध्ये टी-शर्ट्सची किंमत 145 रुपयांपासून सुरू होते. याशिवाय लहान मुलांसाठी रंगीबेरंगी आणि आकर्षक कॅज्युअल कपडे 149 रुपयांपासून मिळतात. महिलांसाठी विविध डिझाइनमधील कुर्त्यांची सुरुवातीची किंमत 299 रुपये असून, दैनंदिन वापरापासून कॅज्युअल आउटिंगपर्यंत अनेक पर्याय ग्राहकांना येथे उपलब्ध आहेत.

मेकअप आणि ब्यूटी प्रॉडक्ट्सचीही येथे चांगली रेंज उपलब्ध आहे. लिपस्टिक, काजळ, फाउंडेशन, नेलपेंटसह विविध कॉस्मेटिक वस्तू परवडणाऱ्या दरात मिळत असल्याने ग्राहकांना फॅशन आणि ब्यूटीशी संबंधित बहुतांश गरजा एकाच ठिकाणी पूर्ण करता येतात.

दररोज नवीन कलेक्शनमुळे वाढतेय ग्राहकांची गर्दी

दररोज नवीन डिझाइन्स आणि ट्रेंडिंग कलेक्शन स्टोअरमध्ये दाखल होत असल्याने ‘झुडिओ’मध्ये ग्राहकांची सतत गर्दी पाहायला मिळते. परवडणाऱ्या किमती, आकर्षक डिझाइन्स आणि एकाच ठिकाणी सर्व वस्तू उपलब्ध असल्यामुळे हे स्टोअर पावसाळी खरेदीसाठी ग्राहकांची पसंती ठरत आहे. पावसाळ्यासाठी आवश्यक वस्तू किंवा दैनंदिन वापराचे ट्रेंडी कपडे खरेदी करायचे असतील तर झुडिओ हे स्टोअर एक चांगला पर्याय ठरू शकतो.

Follow Us